मध हा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. मधामध्ये फ्लेवोनाईड्स, ऑर्गेनिक ॲसिड असे अनेक ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. शिवाय तज्ज्ञ असंही सांगतात की मध नियमितपणे खाल्ल्यास शरीरातले वाईट कोलेस्टेरॉल तसेच ट्रायग्लिसराईड कमी होण्यासही मदत होते. पण हल्ली अनेकजण चुकीच्या पद्धतीने मध खात आहेत. त्यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते, असं तज्ज्ञ सांगतात. तुम्हीही कोणत्याही तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला न घेता केवळ ऐकीव माहितीवरून गरम पाण्यात मध घालून सकाळी उपाशीपोटी घेत असाल तर ते सगळ्यांच्याच तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं असं नाही. त्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात ते पाहा..(side effects of having honey with hot water)
गरम पाण्यात मध घालून पिण्याचे दुष्परिणाम
आयुर्वेदतज्ज्ञ डिंपल जांगडा यांनी याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की जर तुम्ही गरम पाण्यात मध घालत असाल तर त्यामुळे गरम पाणी आणि मध यांची एक वेगळीच रिॲक्शन होते आणि त्यामुळे मधामधले पौष्टिक घटक कमी होतात.
केस वाढत नाहीत म्हणून कापतच नाही? तुम्ही चुकताय- बघा नियमितपणे हेअरकट करण्याचे ४ फायदे
त्याच्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स, एन्झाईम्स आणि बायोॲक्टीव्ह कंपाउंड नष्ट होऊन जातात. एवढंच नाही तर त्या रिॲक्शनमुळे तयार होणारे काही घटक तब्येतीसाठी हानिकारकही ठरू शकतात. म्हणूनच तज्ज्ञांच्या मते मध कधीही गरम पाणी तसेच गरम पदार्थांसोबत खाऊ नये.
ज्यांना वारंवार ॲलर्जी होण्याचा त्रास असतो, त्या लोकांनीही मध आणि गरम पाणी हे कॉम्बिनेशन टाळायला हवं. जर तुम्हाला सकाळी मध आणि पाणी घ्यायचंच असेल तर पाणी खूप गरम करू नका.
ते अगदी हलकं कोमट करून फक्त रूम टेम्परेचरवर आणा. त्यानंतर त्यात मध घाला आणि मग ते पाणी प्या. पण या बाबतीतही तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. सलाड, योगर्ट, फळं, स्मूदी यांच्यासोबत मध नॅचरल स्वीटनर म्हणून खाऊ शकता.