हल्ली बऱ्याच जणांच्या आहारात ब्रोकोली दिसून येते. ब्रोकोलीची भाजी किंवा नुसती वाफवलेली ब्रोकोली अनेकजण आहारात घेतात. ब्रोकोली आरोग्यासाठी चांगलीच आहे. त्यातून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ब्रोकोलीला सुपरफूड म्हटलं जातं. पण ब्रोकोली खाण्याचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. काही आजार असणाऱ्या लोकांनी तर ब्रोकोली खाणं पुर्णपणे टाळायला हवं. कारण त्याचे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात (Side Effects of Eating Broccoli). त्याविषयीचीच ही खास माहिती...(why to avoid eating broccoli?)
ब्रोकोली खाणं कोणी टाळायला हवं?
१. ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्याचप्रमाणे त्यात रॅफिनोज ही कॉम्प्लेक्स शुगरही असते. ती पचायला बरीच कठीण असते.
केस भराभर पिकू लागले? 'या' पद्धतीने मेहेंदीचं तेल करून केसांना लावा, नॅचरली काळे होतील
त्यामुळे जेव्हा ब्रोकोली जास्त प्रमाणात खाल्ली जाते तेव्हा त्यातली शुगर पचत नाही आणि ती मोठ्या आतड्यांमध्ये फर्मेंट व्हायला सुरुवात होते. यामुळे पोट बिघडणे, गॅसेस होणे, पोट गच्च होणे असे त्रास होऊ लागतात. काही जणांना पोटदुखीचा त्रासही होतो, असं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन यांच्या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.
२. ज्या लोकांना थायरॉईडचा त्रास असतो, त्यांनीही ब्रोकोली खाणं टाळायला हवं असं त्या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. कारण ब्रोकोलीमध्ये goitrogens कंपाऊंड असतात.
तेलाचे डाग पडून टिफिन बॅग काळपट, गचाळ झाली? २ सोपे उपाय- १० मिनिटांत बॅग स्वच्छ
त्यांच्यामुळे शरीरात आयोडिन शोषून घेण्यात बाधा येते आणि त्यामुळे मग थायरॉईड हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. म्हणूनच ज्यांना आधीपासूनच थायरॉईडचा त्रास आहे, त्यांनी ब्रोकोली खाण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.