Join us

श्रावण शुक्रवारी गूळ फुटाण्यांचा नैवैद्य दाखवा आणि आठवणीने खा! महिलांसाठी ५ महत्वाचे फायदे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2025 14:42 IST

Shravan Special Naivedya: गूळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य एवढा का महत्त्वाचा आहे आणि तो घरातल्या सगळ्यांनी का खायला हवा ते बघूया..(health benefits of eating jaggery and roasted chana together)

ठळक मुद्देगूळ आणि फुटाणे हे जणू काही स्वस्तात मिळणारं सुपरफूड आहे.

श्रावण महिना म्हणजे आनंद, उत्साह, सणवार आणि व्रतवैकल्यांचा महिना. या महिन्यात येणाऱ्या काही खास दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाकही केला जातो आणि श्रावणातल्या सोमवारी उपवासही केला जातो. म्हणजेच काय तर पुरणावरणाची चव चाखण्यासोबतच उपवासाची शिस्तही कशी पाळायची याचा धडाच श्रावण देत असतो. आता श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीची, लक्ष्मीची पुजा केली जाते. ही पूजा झाल्यानंतर देवीला गूळ- फुटण्यांचा नैवेद्य दाखवला जातो (Shravan Special Naivedya). सायंकाळी आजुबाजुच्या महिलांना हळदी- कुंकवासाठी बोलावून त्यांना गूळ फुटाणे (gud and chana) दिले जातात. यामागचा उद्देश एवढाच असावा की काही निमित्ताने महिलांनी एकत्र यावे आणि सगळ्यांनी मिळून गूळ- फुटाणे हा अतिशय पौष्टिक पदार्थ खावा. गूळ आणि फुटाणे हे जणू काही स्वस्तात मिळणारं सुपरफूड आहे. ते नियमितपणे खाल्ल्यास शरीराला कोणकोणते फायदे होतात ते पाहूया..(health benefits of eating jaggery and roasted chana together)

 

गूळ- फुटाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

१. बहुतांश लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असते. ती भरून काढण्यासाठी आपण महागडे पदार्थ खातो. महागडे प्रोटीन शेक विकत घेऊन पितो, पण घरात असणाऱ्या गूळ - फुटाण्यांकडे मात्र दुर्लक्ष करतो. गूळ आणि फुटाणे एकत्र खाल्ले तर त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.

IVF करण्याचं योग्य वय कोणतं? डॉक्टर सांगतात बाळ होण्यासाठी योग्य वेळी-योग्य विचार कसा करायचा..

२. गूळ आणि फुटाण्यांमधून भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फोलेट मिळतं. त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास असतो त्यांनी गूळ- फुटाणे आवर्जून खायला हवे.

 

३. फुटाण्यांमध्ये असणारे कॅल्शियम हाडं बळकट ठेवण्यासाठी तसेच संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात.

नेहमीच पोट दुखतं, लघवी करताना जळजळ होते? तज्ज्ञ सांगतात भेंडी खाणं ठरू शकतं त्रासदायक, कारण...  

४. सर्दी, खोकला, कफ असा त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी गूळ फुटाणे एकत्र करून खाणे खूप फायद्याचे ठरते.

५. ज्यांना नेहमीच अपचनाचा, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांच्यासाठीही फुटाणे खूप उपयुक्त ठरतात. कारण फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होते. 

 

टॅग्स :श्रावण स्पेशलआरोग्यहेल्थ टिप्सअन्न