Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज अर्धा तास 'या' पद्धतीनं चाला; जीम-डाएट न करता झरझर उतरेल चरबी-सुडौल दिसाल

रोज अर्धा तास 'या' पद्धतीनं चाला; जीम-डाएट न करता झरझर उतरेल चरबी-सुडौल दिसाल

Right Way To Walk For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी तासनतास जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. जर तुम्ही रोज फक्त ३० मिनिटे योग्य पद्धतीने चाललात, तर तुम्ही वेगाने वजन कमी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:06 IST2026-01-30T16:04:20+5:302026-01-30T16:06:40+5:30

Right Way To Walk For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी तासनतास जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. जर तुम्ही रोज फक्त ३० मिनिटे योग्य पद्धतीने चाललात, तर तुम्ही वेगाने वजन कमी करू शकता.

Right Way To Walk For Weight Loss : Walking For Weight Loss | रोज अर्धा तास 'या' पद्धतीनं चाला; जीम-डाएट न करता झरझर उतरेल चरबी-सुडौल दिसाल

रोज अर्धा तास 'या' पद्धतीनं चाला; जीम-डाएट न करता झरझर उतरेल चरबी-सुडौल दिसाल

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच जणांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही तसंच फिजिकल एक्टिव्हीटीजही कमी प्रमाणात केल्या जातात. रोजच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही चालण्यासाठी थोडा वेळ काढला तरी तुमचं काम सोपं होईल. बरेच लोक म्हणतात मी खूप चालतो तरी वजन कमी होत नाही. पण नुसतं चालण्यापेक्षा योग्य पद्धत लक्षात घेतली तर त्याचा फायदा जास्त दिसून येतो. (Right Way To Walk For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी तासनतास जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. जर तुम्ही रोज फक्त ३० मिनिटे योग्य पद्धतीने चाललात, तर तुम्ही वेगाने वजन कमी करू शकता. चालणे हा व्यायामाचा सर्वात सोपा प्रकार असला तरी, त्यात काही तांत्रिक बदल केल्यास त्याचे रूपांतर 'फॅट बर्निंग' वर्कआउटमध्ये होऊ शकते. (Walking For Weight Loss)

ब्रिस्क वॉकिंग 

नुसते रमत-गमत चालण्यापेक्षा 'ब्रिस्क वॉकिंग' करा. याचा अर्थ असा की, तुमचा चालण्याचा वेग इतका असावा की तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी बोलताना थोडे धाप लागल्यासारखे वाटेल. साधारणपणे एका मिनिटात १०० ते १२० पावले टाकण्याचा प्रयत्न करा.

इंटरव्हल ट्रेनिंग 

हा वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ३० मिनिटांच्या चालीत पुढील क्रम फॉलो करा. पहिली ५ मिनिटे वॉर्म-अप करा. पुढील २ मिनिटांनी खूप वेगाने चाला. त्यानंतर १ मिनिट पुन्हा संथ गतीने चाला. याला 'हाय-इंटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंग' म्हणतात, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने जळतात.

चढणीचा रस्ता निवडा

सपाट जमिनीवर चालण्यापेक्षा टेकडी किंवा चढणीच्या रस्त्यावर चालल्यामुळे जास्त ऊर्जा खर्च होते. यामुळे तुमच्या पायांच्या स्नायूंना अधिक ताण मिळतो आणि पोटाचा घेरा कमी होण्यास मदत होते.

हातांची हालचाल महत्वाची

चालताना तुमचे हात कोपरातून ९० अंशात दुमडलेले असावेत. हातांची वेगाने हालचाल केल्यामुळे शरीराचा समतोल राहतो आणि चालण्याचा वेग वाढण्यास मदत होते. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. चालताना नेहमी ताठ उभे राहा, खांदे मागे झुकलेले आणि नजर समोर ठेवा. यामुळे फुफ्फुसांना जास्त ऑक्सिजन मिळतो आणि तुम्ही लवकर थकत नाही.

Web Title : सही तरीके से चलें, वजन घटाएं; जिम, डाइट की ज़रूरत नहीं!

Web Summary : रोजाना 30 मिनट सही ढंग से चलने से वजन कम होता है, जिम या डाइट की आवश्यकता नहीं होती। तेज चलना, अंतराल प्रशिक्षण, ढलान वाले रास्ते और हाथ की गति कैलोरी बर्न और मांसपेशियों को टोन करते हैं, जिससे समग्र फिटनेस बढ़ती है।

Web Title : Lose weight by walking right; no gym, diet needed!

Web Summary : Walking correctly for 30 minutes daily aids weight loss without needing gym or diet. Brisk walking, interval training, inclined paths, and arm movements boost calorie burn and tone muscles, enhancing overall fitness.