Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उन्हाळ्यात ढसाढसा भरपूर ताक पिता? पाहा कोणी-कसं आणि किती ताक प्यावं?

उन्हाळ्यात ढसाढसा भरपूर ताक पिता? पाहा कोणी-कसं आणि किती ताक प्यावं?

Right Way To Drink Buttermilk As Per Ayurveda : दुपारच्या जेवणानंतर तर काहीजण रात्रीच्या जेवणानंतर ताक पितात. पण ताक प्यायल्यानं प्रत्येकालाच फायदा होतोच असं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:51 IST2026-03-01T19:56:20+5:302026-03-02T12:51:08+5:30

Right Way To Drink Buttermilk As Per Ayurveda : दुपारच्या जेवणानंतर तर काहीजण रात्रीच्या जेवणानंतर ताक पितात. पण ताक प्यायल्यानं प्रत्येकालाच फायदा होतोच असं नाही.

Right Way To Drink Buttermilk As Per Ayurveda : Right way To Drink Buttermilk | उन्हाळ्यात ढसाढसा भरपूर ताक पिता? पाहा कोणी-कसं आणि किती ताक प्यावं?

उन्हाळ्यात ढसाढसा भरपूर ताक पिता? पाहा कोणी-कसं आणि किती ताक प्यावं?

उन्हाळ्याच्या दिवसांत बरेच लोक आवडीनं ताक पितात. काहीजण प्लेन ताक पितात तर  काहीजण त्यात जीरं घालून किंवा मसाले घालून मसाला ताक पितात. दुपारच्या जेवणानंतर तर काहीजण रात्रीच्या जेवणानंतर ताक पितात. पण ताक प्यायल्यानं प्रत्येकालाच फायदा होतोच असं नाही (Right way To Drink Buttermilk). प्रत्येकाची शरीर उद्भवणारे त्रास हे वेगळे असतात. त्यामुळे सरसकट ताक न पिता ताक पिताना काही बदल करणं आवश्यक आहे. आयुर्वेदात प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या प्रकृतीनुसार ताकाचे सेवन वेगेवगळे असते. उदाहरणार्थ ज्यांचे शरीर वात प्रकृतीचे आहे त्यांच्यासाठी ताक पिण्याआधी काही बदल करणं आवश्यक आहे. (Right Way To Drink Buttermilk As Per Ayurveda)

वात असलेल्यांनी ताक कसे प्यावे?

वात प्रकृती असलेल्यांनी थंड ताक थेट पिण्याऐवजी ताक १ चिमूटभर सैंधव मीठ घालून प्यायला हवं. असं केल्यानं पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत तसंच पचनक्रियाही चांगली राहते. अनेकदा ताक प्यायल्यानंतर लोक लगेचच शौचास जातात. सैंधव मीठ किंवा काळं मीठ घालून ताक प्यायल्यानं ही समस्या कमी होते तसंच पाचनअग्नी मजबूत राहतो. योग्य पद्धतीनं  प्यायल्यास वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी ताक लाभदायक ठरते. 

घरीच सुक्या खोबऱ्यापासून करा शुद्ध नारळाचं तेल; सोपी ट्रिक-मशीन न वापरता झटपट निघेल तेल

पित्त प्रकृती असलेल्यांनी ताक कसे प्यावे?

पित्त प्रकृती असलेल्यांनी एक चिमूटभर खडीसाखर मिसळून ताक प्यायला हवं.  पित्त शरीरात उष्णता तयार करतं  आणि त्यामुळे जळजळ, एसिडीटी होऊ शकते. ताक आणि  खडीसारखेरचं मिश्रण शरीराला थंड ठेवण्यास मदत करतं. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

कफ प्रकृती असलेल्यांनी कसे ताक प्यावे?

कफ प्रकृती असलेल्यांनी ताकात एक चुटकी सुंठ मिसळून प्या. यामुळे ताक प्यायल्यानंतर लगेच कफ निघणार नाही. घसा दुखणं,नाक बंद होणं अशा समस्या उद्भवणार नाहीत तसंच पचन अग्नी मंद होणार नाही. आयुर्वेदानुसार कोणत्याही पेय किंवा खाद्यपदार्थांचा प्रभाव कोणत्याही व्यक्तीवर समान होत नाही. योग्य पद्धतीनं सेवन केल्यास कोणताही पदार्थ औषधाप्रमाणे काम करतो. म्हणून शरीराचे दोष आणि प्रवृत्ती लक्षात घेऊनच पदार्थांचे सेवन करावे. जेणेकरून  पचन संतुलित राहण्यास मदत होईल.

Web Title : गर्मी में सही तरीके से छाछ पिएं: जानें किसे, कैसे और कितनी

Web Summary : गर्मी में छाछ पीना आम है, लेकिन हमेशा फायदेमंद नहीं होता। आयुर्वेद पाचन और स्वास्थ्य के लिए छाछ के सेवन को व्यक्तिगत शरीर के प्रकारों (वात, पित्त, कफ) के अनुरूप बनाने का सुझाव देता है। अपने शरीर के प्रकार के आधार पर नमक, चीनी या अदरक मिलाएं।

Web Title : Drink Buttermilk Right This Summer: Know Who, How, and How Much.

Web Summary : Drinking buttermilk in summer is common, but not always beneficial. Ayurveda suggests tailoring buttermilk consumption to individual body types (Vata, Pitta, Kapha) for optimal digestion and health. Add salt, sugar or ginger based on your body type.