जगभरात व्हाईट राईस हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे. जास्तीत जास्त लोकांना भात खायला आवडतो पण जास्त प्रमाणात भात खाणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरतं. अनेक भात आवडीने खाणाऱ्या लोकांना ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला दिला जातो. अभ्यासातून हे दिसून आलं आहे की भात खाल्ल्यानं टाईप २ डायबिटीसचा धोका वाढतो. जगभरात एक ही गंभीर समस्या वाढत आहे. भात खाणं चुकीची गोष्ट नाही तुम्ही यात काही बदल करून रोजच्या आहारात भाताचा समावेश करू शकता. (Right Way To Cook White Rice)
पांढरा भात तुम्ही विशिष्ट पद्धतीनं शिजवला तर होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. न्युट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी ५ ट्रिक्स शेअर केल्या आहेत. ज्यामुळे तुम्ही आनंदानं भात खाऊ शकता. भात करण्याची योग्य करण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी ज्यामुळे शुगर स्पाईक टाळता येतं. याशिवाय शरीरातील टॉक्सिन्स निघून जाण्यासही मदत होते.
तांदूळ धुणं गरजेचं आहे
सगळ्यात आधी तांदूळ व्यवस्थित धुणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही भात बनवता तेव्हा धुताना पांढरं पाणी पूर्ण काढून टाका. पाणी पारदर्शक होईपर्यंत तांदूळ धुवा. यामुळे त्यातील धोकादायक आर्सेनिक तत्व निघून जातात आणि कॅन्सरसारख्या आजारांपासूनही बचाव होतो.
याशिवाय, तांदूळ आणि पाण्याचे योग्य प्रमाण लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येकजण तांदूळ एका निश्चित प्रमाणात शिजवतो जेणेकरून तो चांगला शिजेल. नेहमी तांदूळ आणि पाणी १:६ च्या प्रमाणात घ्या आणि उकळण्याच्या पद्धतीने शिजवा.
पांढरा भात खाण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यामुळे होणारी साखरेची वाढ. हे टाळण्यासाठी, एका पोषणतज्ज्ञांनी एक युक्ती सांगितली आहे. साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, उकळत्या पाण्यात एक तमालपत्र, काही दालचिनीच्या काड्या आणि २ लवंगा घाला. हे मसाले अँटीऑक्सिडंट्स आणि वनस्पती संयुगांनी समृद्ध आहेत जे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि स्थिर रक्तातील ग्लुकोजला आधार देण्यास मदत करू शकतात.
तुपाचा वापर
अनेकजण लठ्ठपणाला घाबरतात त्यामुळे तुप खात नाही. भाताची पौष्टीकता वाढवण्यासाठी तुम्ही यात १ ते २ चमचे तूप घालू शकता. यातील लिनोलिक एसिड आणि ब्यूटिरिक एसिड स्टार्चचे पचन संथ करते. जेव्हा भात जास्त शिजेल तेव्हा अतिरक्त पाणी काढून टाका. ज्यामुळे स्टार्च निघून जाईल.