भात हा फक्त खाद्यपदार्थ नसून संस्कृतीचा आणि आहाराचा महत्वाचा भाग आहे. अनेक घरांमध्ये दररोज भात शिजवला जातो. पण तो कोणत्या पद्धतीनं शिजवला जातो यावर त्याचे पौष्टीक मूल्य आणि आरोग्यावर होणारे परीणाम अवलंबून असतात (How To Cook Rice). अधुनिक जीवनशैली आणि वाढत्या आरोग्याच्या समस्या पाहता आपण भात शिजवण्याच्या पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे. हजारो वर्षांपासून आरोग्य शास्त्राचा आधार असलेल्या आयुर्वेदात भात शिजवण्याची विशिष्ट पद्धत सांगितली आहे जी केवळ पचन सुधारत नाही तर रक्तातील साखर कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही प्रभावी ठरते. (Which Is Right Way To Cook Rice)
आयुर्वेदानुसार भात शिजवण्याची योग्य पद्धत कोणती? (Right Way To Cook Rice As Per Ayurveda )
आयुर्वेदानुसार भात शिजवताना पाण्याचे प्रमाण आणि ते शिजवण्याची पद्धत ही खूपच महत्वाची मानली जाते. तांदळातील अनावश्यक स्टार्च काढून टाकणं म्हणजेच भाताचे मांड काढून टाकणे ही सर्वात आरोग्यदायी पद्धत मानली जाते.
आयुर्वेदात भात शिजवण्याची पद्धत अशी असते
१ वाटी तांदळाला ४ वाटी पाणी किंवा त्याहून अधिक पाणी वापरावे. तांदूळ नेहमीच्या पद्धतीनं उकळत्या पाण्यात शिजवून घ्यावा. भात पूर्ण शिजल्यावर भातातील जास्त झालेले पाणी निथळून वेगळे करावे. या पद्धतीनं शिजवलेला भात पचायला अत्यंत हलका असतो आणि शरीरातील दोष संतुलित ठेवण्यास मदत करतो.
साखर आणि वजन नियंत्रणात राहते
तांदळातील स्टार्चचा एक घटक म्हणजे अमायलोपेक्टिन हा घटक रक्तातील साखर वेगानं वाढवण्यास कारणीभूत ठरतो. भातातील अतिरीक्त पाणी काढून टाकल्यामुळे हा स्टार्चचा काही भाग पाण्यासोबत बाहेर पडतो यामुळे भातातील स्टार्चचे प्रमाण कमी होते. स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी झाल्यामुळे शिजवलेल्या भाताचा ग्लायसेलमिक इंडेक्स कमी होतो. (Ref) कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ रक्तातील साखर हळूहळू आणि नियंत्रणात वाढवतात. ज्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना फायदा होतो. काही संधोशनानुसार मांड काढून शिजवलेला भात साध्या पद्धतीनं शिजवलेल्या भातापेक्षा १० ते १५ टक्के कमी कॅलरीज देऊ शकतो. यामुळे दररोजच्या आहारात कॅलरीजचे प्रमाण नियंत्रणात राहून वजन कमी करण्यास मदत होते.
