भात फक्त एक जेवणाचा प्रकार नाही तर भारतीय आहाराचा एक भाग आहे. तांदळाबाबत लोकांच्या मनात बरेच, समज-गैरसमज आहेत. काही लोकांच्या म्हणण्यांनुसार भात खाल्ल्यानं लठ्ठपणा वाढतो तर काहीजण असं म्हणतात की तांदूळ शुगर लेव्हल वाढवतात. प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात चांगला की पातेल्यात शिजवलेला असा प्रश्न अनेकांना पडतो. (Cooking Rice In Cooker Vs Utensils)
लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की सगळ्यात जास्त पोषक तत्व कोणत्या भातात असतात. प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला की पातेल्यात शिजवलेला कोणता भात जास्त पौष्टीक असतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या दोन्हींमधला फरक समजून घेऊ. (Rice Cooked In a Pressure Cooker Or Boiled Which Has More Nutrition)
प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात
प्रेशर कुकरमध्ये तांदूळ शिजवताना पाणी पूर्णपणे शोषून घेतलं जातं. कारण यातील पाणी बाहेर फेकलं जात नाही. तांदळात व्हिटामीन बी कॉम्पलेक्स आणि मिनरल्स असतात ते आतच राहतात. पोषक तत्व टिकून राहण्यासाठी कुकरमध्ये भात शिजवण्याची पद्धत उत्तम मानली जाते. पण यात स्टार्चचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे कॅलरी काऊंट वाढतो. डायबिटीसच्या रुग्णांसाठी हा चिंतेचा विषय असू शकतो.
पातेल्यात शिजवलेला भात
पातेल्यात भात शिजवताना तांदूळ उकळल्यांनतर ते पाणी गाळून वेगळे केले जाते. पाणी काढून टाकल्यामुळे भातातील बरेच व्हिटामीन्स आणि मिनरल्स निघून जातात. पोषणाबाबत कुकरमध्ये शिजवलेल्या भाताच्या तुलनेत हा भात कमी पौष्टीक असतो.
या भाताचा फायदा असा की पातेल्यात भात शिजवताना पाणी काढून टाकल्यामुळे यातील एस्क्ट्रा स्टार्च आणि आर्सेनिकसारखी पोषक तत्व निघून जाजात. म्हणून हा भात पचायला हलका होतो यात कॅलरीजही कमी होतात.
जर तुम्ही वजन वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात उत्तम ठरतो कारण यातून पूर्ण पोषण मिळते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पातेल्यात शिजवलेला भात खा. जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तर पातेल्यात शिजवलेला भात खाऊ शकता. कारण शुगर वाढवणारे स्टार्च यातून निघून जातात.
