पोटाची चरबी कमी करणं आजकाल एक आव्हान बनलं आहे. बेली फॅट शरीराची सुंदरता खराब करत नाही तर आरोग्यासाठी धोकादायकही मानले जाते. पोटाच्या आजूबाजूला जमा झालेली चरबी डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज आणि फॅटी लिव्हरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवते. (Ayurvedic Remedy To Reduce Belly Fat)
पोटाचा घेर वाढलाय अशी बऱ्याचजणांची तक्रार असते.पोटाची चरबी वाढत गेली तर संपूर्ण शरीराचा आकारच बिघडतो. बेली फॅट वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात जसं की बराचवेळ बसून काम करणं, चुकीची लाईफस्टाईल,जास्त प्रमाणात जंक फूड खाणं ज्यामुळे पोट वाढत जातं. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही खास टिप्स फॉलो करू शकता. (Rajsthani Vaid Jagdish Sumn Shares Effective Ayurvedic Remedy To Reduce Belly Fat)
राजस्थानी वैद्य सांगतात की पोटाची चरबी कमी करण्यासाठी वारंवार औषधं घेण्याची आवश्यकता नाही. चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता ज्यामुळे पचनक्रियाही चांगली राहील. सगळ्यात आधी ओवा, जीरं, मेथी दाणे, कलौंजी, अळशीच्या बीया सर्व पदार्थ व्यवस्थित सुकवून घ्या. नंतर मंद आचेवर भाजून घ्या जेणेकरून यातील मॉईश्चर निघून जाईल. याची पावडर बनवून कोणत्याही स्वच्छ डब्यात ठेवा.
रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा ही पावडर घालून भिजवायला ठेवा. सकाळी २ ते ३ वेळा व्यवस्थित उकळवून घ्या. त्यात अर्धा लिंबू पिळा आणि १ चमचा मध मिसळा. मध जास्त गरम पाण्यात घालू नका. चहाप्रमाणे हळू हळू घोटून या पाण्याचे सेवन करा.
हा उपाय केल्यानं पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. नियमित हा उपाय केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. ज्यामुळे अन्न पचायला त्रास होत नाही. पोट साफ होण्यास तसंच विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. मेटाबॉलिझ्म चांगला राहतो तसंच वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.हा एक घरगुती नॅच्युरल उपाय असून बॅलेन्स डाएट आणि योग्य आहार घेऊन तुम्ही सहज वजन कमी करू शकता.
