Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भोपळ्याचे रायते, अभिनेत्री भाग्यश्रीची ‘गट स्पेशल’ चविष्ट सोपी रेसिपी-पचन सुधारते

भोपळ्याचे रायते, अभिनेत्री भाग्यश्रीची ‘गट स्पेशल’ चविष्ट सोपी रेसिपी-पचन सुधारते

Pumpkin Raita Is Beneficial For Gut Health : वयाच्या ५६ व्या वर्षीही तिची एनर्जी आणि फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:40 IST2026-02-05T13:30:41+5:302026-02-05T18:40:38+5:30

Pumpkin Raita Is Beneficial For Gut Health : वयाच्या ५६ व्या वर्षीही तिची एनर्जी आणि फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Pumpkin Raita Is Beneficial For Gut Health Actress Bhagyashree Shared This Healthy Recipe For Gas, Constipation | भोपळ्याचे रायते, अभिनेत्री भाग्यश्रीची ‘गट स्पेशल’ चविष्ट सोपी रेसिपी-पचन सुधारते

भोपळ्याचे रायते, अभिनेत्री भाग्यश्रीची ‘गट स्पेशल’ चविष्ट सोपी रेसिपी-पचन सुधारते

प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री ही नेहमीच तिच्या फिटनेसमुळे आणि साधेपणामुळे कायमच चर्चेत असते. सिनेसृष्टीपासून लांब असूनही तिनं  लोकांच्या मनात जागा तयार केली आहे.   भाग्यश्री अभिनयासोबत आहार विशेषज्ञ म्हणूनही ओळखली जाते. वयाच्या ५६ व्या वर्षीही तिची एनर्जी आणि फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अलिकडेच तिनं गट हेल्थबाबत एक फायदेशीर रेसिपी शेअर केली आहे. जे तिचे कम्फर्ट फूड आहे. ज्यामुळे पोट थंड, शांत राहण्यास आणि पचनक्रिया चांगली  राहण्यास मदत होते.  ज्यामुळे डायजेशन सुधारण्यास मदत होते. (Pumpkin Raita Is Beneficial For Gut Helth Actress Bhagyashree Shared This Healthy Recipe For Gas, Bloating And Constipation)

भोपळ्याच्या रायता कसा करावा?

भोपळ्याचा रायता करण्यासाठी तुम्हाला फार बेसिक साहित्य लागेल. जसं की दही, कांदा, भोपळा, मोहोरीचं तेल, कढीपत्ता, हिंग आणि कसूरी मेथी, शेंगदाणे, मीठ चवीनुसार.

गट हेल्थसाठी दही कसे फायदेशीर ठरते?

दह्यात प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली  राहण्यास मदत होते. कांद्यात केरसेटिन असते ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. भोपळा पोट शांत ठेवण्यास मदत करतो यात फायबर्स, एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन ए, सी मोठ्या प्रमाणात असते. मोहोरीच्या तेलात ब्युटिरीक एसिड असते. ज्यामुळे पोटाची सूज नियंत्रणात राहण्यास मदत होते.  कढीपत्ता, हिंग, कसूरी मेथी पोटाचे आरोग्य चांगले ठवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

भोपळ्याचा रायता कसा करतात?

 भोपळ्याचा रायता करण्यासाठी सगळ्यात आधी १ कप ताजं दही घ्या नंतर हे दही व्यवस्थित फेटून घ्या. नंतर दह्यात एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर घालून त्यात शिजवलेल्या भोपळ्याचे काप घाला.  हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या. 

नंतर १ चमचा तेलात कढीपत्ता, हिंग, कसुरी मेथी घाला. हे पदार्थ व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यात शेंगदाणे घाला नंतर दह्याचा तडका घाला. भोपळ्याचा रायता तयार आहे. आठवड्यातून २ ते  ३ वेळा तुम्ही या पदार्थाचा आहारात समावेश केला तर पोटाच्या समस्या कमी होतील, हट हेल्थ चांगली राहील तसंच तब्येतीचं होणारं नुकसान टाळण्यास मदत होईल.

Web Title : भाग्यश्री का पेट के स्वास्थ्य के लिए कद्दू रायता रेसिपी।

Web Summary : अभिनेत्री भाग्यश्री ने पेट के अनुकूल कद्दू रायता की रेसिपी साझा की। दही, कद्दू और मसालों से बना यह सरल व्यंजन पाचन में मदद करता है, सूजन को कम करता है और स्वस्थ पेट को बढ़ावा देता है। स्वस्थ पेट के लिए इसे अपने आहार में शामिल करें।

Web Title : Bhagyashree's pumpkin raita recipe for gut health, digestion.

Web Summary : Actress Bhagyashree shares her gut-friendly pumpkin raita recipe. This simple dish, made with yogurt, pumpkin, and spices, aids digestion, reduces bloating, and promotes a healthy gut. Include this in your diet for a healthy gut.