Join us

भारतीय क्रिकेट संघाचे पोषणतज्ज्ञ सांगतात, वजन कमी करण्यासाठी सोप्या टिप्स- एकदा करा, व्हा फिट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:21 IST

Weight Loss Tips: तुम्हीही वजन वाढल्यानं वैतागले असाल आणि कमी करण्याचा सोपा मार्ग शोधत असाल तर हा लेख नक्कीच तुमच्या कामात येईल.

Weight Loss Tips: वजन वाढलं, पोट बाहेर आलं, मांड्यांवर चरबी वाढली अशा वजनासंबंधी अनेक चिंता अनेकांना सतावत आहेत. त्यामुळे लोक वजन कमी करण्यासाठी नको नको त्या गोष्टी करतात. कुणी जेवण बंद करतात, कुणी एकदाच जेवतात, कुणी खूप एक्सरसाईज करतात अशा अनेक गोष्टी केल्या जातात. पण यात सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. बाहेर खाणं, फिजिकल अॅक्टिविटी न करणं अशाच वेगवेगळ्या कारणांमुळे वजन वाढतं. तुम्हीही वजन वाढल्यानं वैतागले असाल आणि कमी करण्याचा सोपा मार्ग शोधत असाल तर हा लेख नक्कीच तुमच्या कामात येईल.

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंचे न्यूट्रिशनिस्ट राहिलेले सूरज ठाकुरिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी वजन कमी करण्याची एक सोपी ट्रिक सांगितली आहे. 

काय म्हणाले न्यूट्रिशनिस्ट?

सूरज ठाकुरिया यांनी सांगितलं की, 'जर तुम्हाला वजन कमी करायचंच असेल तर यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे घराची सफाई करा'. सफाईमध्ये त्यांच्या म्हणण्याचा उद्देश इथे झाडझूड किंवा लादी पुसणे याच्याशी नाही तर घरातील जंक फूड बाहेर करण्याचा आहे. 

न्यूट्रिशनिस्टनुसार, जंक फूड आणि अनहेल्दी स्नॅक्स या गोष्टी वजन वाढण्यासाठी सगळ्यात जास्त जबाबदार असतात. त्यामुळे सगळ्यात आधी घरातील सगळे जंक फूड घराबाहेर काढा. चटपटीत पदार्थ, मसालेदार पदार्थ, मिठाई आणि चॉकलेट सगळं बाहेर फेका. नाही तर कुणाला द्या किंवा लपून ठेवा. जर असे पदार्थ तुमच्या आजूबाजूला नसतील तर ते खाण्याची तुमची इच्छाच होणार नाही. हे पदार्थ खाणं टाळलं तर तुमचं कॅलरी इनटेक कमी होईल आणि वजन कंट्रोलमध्ये राहील.

वजन कमी करण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घेणं फार महत्वाचं ठरतं. जंक फूड खाणं बंद केल्यावर आणखी काही गोष्टींच्या सवयी लावल्या तर वजन कमी होईल. जसे की, थोडा वेळ काढून पायी चाला, सायकलिंग करा. याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स