Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नवरात्रीत उपवासासोबत वजनही होईल कमी! पाहा काय खावं, काय टाळावं - वेटलॉससाठी नवरात्री स्पेशल डाएट प्लान...

नवरात्रीत उपवासासोबत वजनही होईल कमी! पाहा काय खावं, काय टाळावं - वेटलॉससाठी नवरात्री स्पेशल डाएट प्लान...

Navratri weight loss diet plan : how to lose weight during navratri fasting : navratri fasting weight loss tips : navratri diet chart for weight loss : 9 days navratri weight loss plan : नवरात्रीत खास डाएट प्लान फॉलो करुन आपण वजन झटपट कमी करू शकतो, नेमकं कसं ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2025 14:01 IST2025-09-22T13:32:14+5:302025-09-22T14:01:27+5:30

Navratri weight loss diet plan : how to lose weight during navratri fasting : navratri fasting weight loss tips : navratri diet chart for weight loss : 9 days navratri weight loss plan : नवरात्रीत खास डाएट प्लान फॉलो करुन आपण वजन झटपट कमी करू शकतो, नेमकं कसं ते पाहा...

Navratri weight loss diet plan how to lose weight during navratri fasting navratri fasting weight loss tips navratri diet chart for weight loss 9 days navratri weight loss plan | नवरात्रीत उपवासासोबत वजनही होईल कमी! पाहा काय खावं, काय टाळावं - वेटलॉससाठी नवरात्री स्पेशल डाएट प्लान...

नवरात्रीत उपवासासोबत वजनही होईल कमी! पाहा काय खावं, काय टाळावं - वेटलॉससाठी नवरात्री स्पेशल डाएट प्लान...

नवरात्रीत बरेचजण उपवास करतात. या दिवसांत उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होऊन वजन कमी करण्याची आयती संधी मिळते. या उपवासाचा उपयोग अनेकजण वजन कमी करण्यासाठी करतात. नऊ दिवस उपवास केल्यावर आपण सात्विक आणि मोजकाच आहार घेतो. उपवासामुळे खाण्यापिण्याच्या (Navratri weight loss diet plan) सवयींवर अनेक बंधने आल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होतेच. परंतु, उपवासादरम्यान चुकीच्या पद्धतीने आहार केल्यास वजन वाढण्याची शक्यताही असते. नवरात्रीत उपवास करून योग्य पद्धतीने खाण्यापिण्याच्या (navratri fasting weight loss tips) सवयींचे पालन केले तर वजन कमी करणे सहज शक्य होते(how to lose weight during navratri fasting).

उपवासाच्या दिवसांत हलका, पौष्टिक आणि संतुलित आहार घेतल्यास वजन कमी करण्याची प्रक्रिया सहज शक्य होते. मग उपवासात नेमकं काय खावं, काय टाळावं आणि वजन कमी करण्यासाठी कोणत्या सवयी स्वतःला लावून घ्याव्यात हे जाणून घेणं गरजेचं आहे. यंदाच्या नवरात्रीत जर आपण देखील उपवास करुन वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर काही खास टिप्स पाहूयात. नवरात्रीत एक खास डाएट प्लान फॉलो करुन आपण वजन झटपट कमी करू शकतो नेमकं कसं ते पाहा... 

नवरात्रीत उपवास करुन करा झटपट वेटलॉस... 

१. नारळ पाणी पिऊन करा दिवसाची सुरुवात :- दिवसाची सुरुवात हायड्रेशनने करा, कारण शरीराला पुरेसं पाणी मिळालं तरच शरीरातील सर्व अवयव आपलं काम योग्यरित्या करू शकतात. यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा किंवा अशक्तपणा जाणवणार नाही. म्हणूनच, दिवसाची सुरुवात नारळ पाणी पिऊन करा.  यात नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट्स असल्याने उपवासादरम्यान शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. 

नवरात्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात ९ दिवस उपवास, खातात दिवसातून फक्त एकच फल, ते ही एकदाच...

२. ब्रेकफास्ट मध्ये काय खावे :- सकाळचा नाश्ता हे दिवसातील पहिले जेवण असते, जे आपला मूड, ऊर्जा आणि रक्तातील साखरेची पातळी यावर परिणाम करते. नाश्त्यामध्ये आपण दही, उकडलेले बटाटे आणि बदाम खाऊ शकता. २५० ग्रॅम दह्यामध्ये चिमूटभर सेंधव मीठ घाला आणि दोन मध्यम आकाराच्या उकडलेल्या बटाट्यांसोबत खाऊशकता. त्याचबरोबर ५ ते ६ भिजवलेले बदामसुद्धा आपण खाऊ शकता. 

वजन कमी करण्यासाठी ‘हा’ चिनी चहा प्या, झरझर उतरेल चरबी, वाटेल फ्रेश...

३. स्नॅक्स टाईम :- नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्यामध्ये आपण हलकासा स्नॅक्स घेऊ शकता. ज्यात आपण एक कप ग्रीन टी आणि एक मध्यम आकाराचे सफरचंद खाऊ शकता. ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स मेटाबॉलिज्म वाढवण्यास आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन कमी होते. तसेच, फायबर, व्हिटॅमिन आणि पोषक तत्व असलेले सफरचंद वजन नियंत्रित ठेवण्यात मदत करते.      

४. दुपारचे जेवण :- स्नॅकनंतर दुपारच्या जेवणात आपण सातूच्या पिठापासून बनवलेला चीला खाऊ शकता. यासोबत एक ग्लास ताक आणि एक प्लेट सॅलॅड  घ्या. यामुळे तुमचे पोट व्यवस्थित भरेल आणि तुम्ही अधिक खाणार नाही, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल. 

५. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी :- जेवणानंतर संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आपण दोन अक्रोड आणि चहा किंवा कॉफी घेऊ शकता. पण, ती गोड करण्यासाठी साखरेऐवजी स्टेव्हियाचा वापर करा. स्टेव्हिया साखरेला एक चांगला आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो.

६. रात्रीचे जेवण :- रात्रीचे जेवण नेहमी साधे आणि हलके असावे, जेणेकरून त्याचे पचन सहज होईल, झोप चांगली लागेल, वजन नियंत्रणात राहील आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहील. यासाठी आपण मिक्स व्हेज सूप पिऊ शकता. त्यात पनीर घालायला विसरू नका. यामुळे तुमच्या दिवसाच्या शेवटच्या जेवणात प्रोटीनचा समावेश होईल.

Web Title: Navratri weight loss diet plan how to lose weight during navratri fasting navratri fasting weight loss tips navratri diet chart for weight loss 9 days navratri weight loss plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.