Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > खरबूज की कलिंगड? वजन कमी करायचं तर उन्हाळ्यात यापैकी कोणतं फळ खाणं जास्त फायद्याचं...

खरबूज की कलिंगड? वजन कमी करायचं तर उन्हाळ्यात यापैकी कोणतं फळ खाणं जास्त फायद्याचं...

Muskmelon Vs Watermelon Which One Is Best For Quick Weight Loss Know Both Summer Fruits Health Benefits : Watermelon Vs Muskmelon For Weight Loss : How Muskmelons And Watermelons Help You Lose Weight In Summer : उन्हाळ्यांत वेटलॉस साठी नेमकं कोणतं फळं खाणं अधिक चांगलं ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2025 08:50 IST2025-03-26T07:11:38+5:302025-03-26T08:50:46+5:30

Muskmelon Vs Watermelon Which One Is Best For Quick Weight Loss Know Both Summer Fruits Health Benefits : Watermelon Vs Muskmelon For Weight Loss : How Muskmelons And Watermelons Help You Lose Weight In Summer : उन्हाळ्यांत वेटलॉस साठी नेमकं कोणतं फळं खाणं अधिक चांगलं ते पाहा...

Muskmelon Vs Watermelon Which One Is Best For Quick Weight Loss How Muskmelons And Watermelons Help You Lose Weight In Summer | खरबूज की कलिंगड? वजन कमी करायचं तर उन्हाळ्यात यापैकी कोणतं फळ खाणं जास्त फायद्याचं...

खरबूज की कलिंगड? वजन कमी करायचं तर उन्हाळ्यात यापैकी कोणतं फळ खाणं जास्त फायद्याचं...

खरबूज आणि कलिंगड ही दोन्ही रसाळ फळं उन्हाळ्यांत फार मोठ्या प्रमाणावर विकली जातात. खरंतर, उन्हाळयात डिहायड्रेशन होऊ नये यासाठी अशी रसाळ, पाणीदार फळं आपण (How Muskmelons And Watermelons Help You Lose Weight In Summer) अधिक जास्त खातो. खरबूज आणि कलिंगड या दोन्ही फळांत ९९ % पाणीच असते. ही दोन्ही फळं डिहायड्रेशन होऊ नये यासाठी फायदेशीर तर असतात, पण सोबतच आपल्या शरीराला थंडावा देण्याचे मुख्य काम करतात. एवढंच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी देखील ही फळं खाल्ली जातात(Muskmelon Vs Watermelon Which One Is Best For Quick Weight Loss).

या दोन्ही फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आणि कॅलरीज खूप कमी प्रमाणांत असतात, यासाठी वेटलॉस करण्यासाठी ही दोन्ही फळं  खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु वजन कमी करण्यासाठी नेमकं या दोन्ही फळांपैकी कोणतं फळं खावं असा प्रश्न आपल्याला पडतो. वजन कमी करण्यासाठी खरबूज (Muskmelon) की कलिंगड (Watermelon) यातील नेमकं कोणतं फळं खावं असा प्रश्न तुम्हांलाही पडला असेल तर, पाहूयात वेटलॉससाठी कलिंगड खावे की खरबूज... 

वजन कमी करण्यासाठी खरबूज की कलिंगड, कोणतं फळं खावं ?

१. खरबूजच्या तुलनेत कलिंगडमध्ये कॅलरीज या फार कमी असतात. एकूण १०० ग्रॅम कलिंगडामध्ये ३० इतक्या कॅलरीज असतात तर तेच १०० ग्रॅम खरबूजमध्ये ३४ इतक्या कॅलरीज असतात. यासाठी कॅलरीजच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास वजन कमी करण्यासाठी कलिंगड खाणे अधिक फायदेशीर ठरते. मल्टीडिसिप्लिनरी डिजिटल पब्लिशिंग इन्स्टिट्यूट (MDPI) नुसार, कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ई, झिंक, मॅग्नेशियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते. हे फळ वजन कमी करण्यास मदत करते याचे एक कारण म्हणजे त्यात असणाऱ्या इलेक्ट्रोलाइट्सची रचना आणि ९९ % पाण्याचे प्रमाण. त्यात जवळजवळ कॅलरीज नसतात. यासाठी वजन कमी करण्यासाठी कलिंगड व टरबूज दोन्ही फळं खावीत, परंतु त्यातही कलिंगड खाणे अधिक फायदेशीर ठरते.   

आलिया भटची फिटनेस ट्रेनर यास्मिनचा सल्ला, ४ सोप्या गोष्टी करा- स्ट्रेस होईल कमी-व्हाल टेंशन फ्री!

२. उन्हाळयात डिहायड्रेशन होऊ नये यासाठी ही दोन्ही फळं खाल्ली पाहिजेत. परंतु खरबूजपेक्षा कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक जास्त असते. 

३. कलिंगडामध्ये लाइकोपीन नावाचे अँटी ऑक्सिडंट असतात, जे आपल्या शरीरातील जास्तीची चरबी जाळण्यास मदत करतात. सोबतच, आपली पचनसंस्था आणि हृदयाचे आरोग्य अधिक चांगले ठेवण्यास मदत करतात. 

वाढते वजन - पोटाची ढेरी होईल कमी, सकाळी उपाशी पोटी खा 'हे' फळं - दिसाल स्लिमट्रिम...

उन्हाळ्यांत आहारामध्ये करा 'हे' ५ बदल, अपचन - डिहायड्रेशन होणार नाही - उन्हाळा जाईल सुखकर...

४. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आणि कॅलरीज कमी असल्याने हे फळं खाल्ल्याने आपले पोट लगेच भरते. याचबरोबर, पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते, यामुळे वारंवार भूक लागत नाही यामुळे वजन कमी करण्यासाठी हे फळं खाणे फायदेशीर ठरते. 

५. याउलट, खरबूजमध्ये देखील फायबरचे प्रमाण अधिक आणि कमी कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी फायबरयुक्त फळं खाणे देखील फायदेशीर ठरु शकते. फायबरयुक्त फळं खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते, यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. परिणामी, वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरते. 

Web Title: Muskmelon Vs Watermelon Which One Is Best For Quick Weight Loss How Muskmelons And Watermelons Help You Lose Weight In Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.