Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दह्यात कालवून खा ‘हे’ ३ पदार्थ, लठ्ठपणा होईल कमी आणि फॅटलॉसही होईल वेगानं

दह्यात कालवून खा ‘हे’ ३ पदार्थ, लठ्ठपणा होईल कमी आणि फॅटलॉसही होईल वेगानं

Curd for Weight Loss : वजन कमी कऱण्यासाठी दही कसं आणि त्यात काय टाकून खाल्ल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी करता येईल हे जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:51 IST2025-06-10T12:41:54+5:302025-06-10T17:51:40+5:30

Curd for Weight Loss : वजन कमी कऱण्यासाठी दही कसं आणि त्यात काय टाकून खाल्ल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी करता येईल हे जाणून घेऊ.

Mix these things in curd to burn fat quickly | दह्यात कालवून खा ‘हे’ ३ पदार्थ, लठ्ठपणा होईल कमी आणि फॅटलॉसही होईल वेगानं

दह्यात कालवून खा ‘हे’ ३ पदार्थ, लठ्ठपणा होईल कमी आणि फॅटलॉसही होईल वेगानं

Curd for Weight Loss :  भरपूर लोकांना रोज दही खाणं आवडतं. दही टेस्टी तर असतंच, सोबतच आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतं. फार पूर्वीपासून दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, नियमितपणे आणि योग्य पद्धतीनं दही खाल्लं गेलं तर वजन कमी करण्यास खूप मदत मिळू शकते. अशात वजन कमी कऱण्यासाठी दही कसं आणि त्यात काय टाकून खाल्ल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी करता येईल हे जाणून घेऊ.

दही एक हाय प्रोटीन आणि प्रोबायोटिक फूड आहे, जे पचन तंत्र सुधारण्यात आणि मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत करतं. दही नियमित खाल्ल्यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्ही जास्त अनहेल्दी स्नॅकिंग कमी खाता. तसेच यातील अॅसिडमुळे चरबी बर्न होण्यास मदत मिळते.

दही आणि काळी मिरी पूड

जर तुम्हाला शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट करायचं असेल तर दही नुसतं तसं न खाता त्यात काली मिरी पूड टाकून खायला हवं. कॅलरी वेगानं कमी करण्यासाठी हे कॉम्बिनेशन खूप फायदेशीर मानलं जातं. कारण दह्यातील अॅसिड आणि काळी मिरीतील तत्व एकत्र आल्यावर चरबी कमी होण्यास मदत मिळते. यात थोडं काळं मीठ टाकाल तर फायदा अधिक मिळेल. दह्यात काळं मीठ आणि काळी मिरीची पूड टाकून खाल्ल्यास शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत मिळते. म्हणजे शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतात. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या जसे की, गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते.

दही आणि जिरे पूड

दह्यात जिरे पूड टाकून खाल्ल्यानं टेस्ट तर वाढतेच, सोबतच वजन कमी करण्यासही मदत मिळते. इतकंच नाही तर जिऱ्यानं पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात आणि दह्यानं पोट शांत राहतं. दही आणि जिऱ्याच्या या खास कॉम्बिनेशननं आतड्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं.

दही आणि दालचीनी

अनेक हेल्थ एक्सपर्ट वजन कमी करण्यासाठी दही आणि दालचीनी हे एक बेस्ट कॉम्बिनेशन मानतात. दही आणि दालचीनीमधील पोषक तत्वांनी शरीराचं मेटाबॉलिज्म अधिक बूस्ट होतं. ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक वेगानं होते. फॅट बर्न होत असल्यानं वजन करण्यास मदत मिळते.
 

Web Title: Mix these things in curd to burn fat quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.