मलायका अरोरा हे बॉलीवूडमधलं असं एक व्यक्तिमत्त्व आहे जे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतं. मलायकाबाबत कितीही उलटसुलट चर्चा होत असल्या तरी एका बाबतीत मात्र तिचं सगळ्यांकडूनच कौतूक होत असतं. आणि ती गोष्टी म्हणजे तिचा जबरदस्त फिटनेस आणि पन्नाशी ओलांडल्यानंतरही टिकून राहिलेलं सौंदर्य. आता या गोष्टी टिकवून ठेवणं काही सोपं नाही. त्यासाठी मलायका रोजच भरपूर व्यायाम करते. फिटनेसबाबत ती तिच्या चाहत्यांनाही नेहमीच मार्गदर्शन करत असते (Malaika Arora's fitness secret and beauty secret). व्यायाम आणि आहार या दाेन गोष्टी ती कटाक्षाने सांभाळते (malaika's favourite ABC juice) आणि म्हणूनच आजही ती प्रचंड फिट आणि सुंदर दिसते.
तिच्या डाएट प्लॅनविषयी ती नेहमीच माहिती देत असते. आता काही दिवसांपुर्वी तिने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती दररोज सकाळी १० वाजता जो एक खास ज्यूस पिते, त्याची माहिती दिली आहे.
दुपारच्या झोपेने खरंच वजन वाढतं? एक्सपर्ट सांगतात दुपारच्या झोपेचं आणि वजनाचं नेमकं कनेक्शन
मलायका म्हणते की ती नियमितपणे एबीसी ज्यूस पिते. एबीसी ज्यूस म्हणजे ॲपल, बीटरुट आणि कॅरेट या तिन्ही पदार्थांचा एकत्रित केलेला ज्यूस. हा ज्यूस करताना ती त्यामध्ये थोडं आलंसुद्धा घालते. आता हा ज्यूस का प्यावा, त्याने आरोग्याला काय फायदे होतात ते पाहूया..
मलायका अरोरासारखा एबीसी ज्यूस पिण्याचे फायदे
सफरचंदामधून भरपूर प्रमाणात फायबर मिळतात. गाजरामधून व्हिटॅमिन ए आणि ई तसेच बीटा कॅरोटीन मिळते. आल्यामधून ॲण्टीऑक्सिडंट्स आणि शरीराला पौष्टिक ठरणारे विविध घटक मिळतात. तसेच बीटमधून भरपूर प्रमाणात लोह आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे हा ज्यूस खरोखरच आरोग्यदायी आहे.
संत्रीच्या सालींचं लोणचं खाल्लंय का? बघा पौष्टिक लोणच्याची चटपटीत रेसिपी, करायला एकदम सोपी
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही तो ज्यूस अतिशय फायदेशीर ठरतो.
पचनक्रिया आणि चयापचय क्रिया चांगल्या होण्यासाठी हा ज्यूस मदत करतो.
मलायका अरोरा जो ज्यूस पिते त्यातून दिवसभर पुरेल एवढी एनर्जी मिळते. शरीराचा थकवा दूर होतो. शिवाय फायबर भरपूर असल्याने हा ज्यूस वेटलॉस करणाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरतो.