Malaika Arora Drink : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ५१ व्या वयातही खूप फिट आणि तरूण दिसते. मलायका तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या डाएट आणि एक्सरसाईजचे व्हिडीओ शेअर करत असते. मलायकानं अनेक मुलाखतींमध्येही सांगितलं की, सकाळी उपाशीपोटी काही खास ड्रिंक पिते. मलायका सकाळी उपाशीपोटी ओवा आणि जिऱ्याचं पाणी पिते. अनेकदा त्यात मेथीचे दाणेही टाकते. हे एक खास हेल्दी ड्रिंक असून वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यात मदत करतं. तसेच शरीरातील विषारी तत्वही या ड्रिंकच्या माध्यमातून बाहेर पडतात.
कस बनवाल हे ड्रिंक?
हे ड्रिंक तयार करण्यासाठी एका भांड्यात साधारण २ ग्लास पाणी घ्या. यात अर्धा चमचा मेथीचे दाणे, जीरे आणि ओवा टाका. हे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी चांगलं उकडून घ्या. पाणी अर्ध झाल्यावर थोडं थेंड होऊ किंवा कोमट पाणी प्या.
काय मिळतात फायदे?
हे ड्रिंक वजन कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर मानलं जातं. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं जे शरीर अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतं. जीरं आणि ओव्यातील खास तत्व पचन तंत्र मजबूत करतात आणि मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. ज्यामुळे चरबी वेगानं बर्न होण्यास मदत मिळते.
ब्लड शुगर कंट्रोल
जिऱ्यामधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण टाइप २ डायबिटीसचा धोका कमी करतात. ओव्यातील एंझाइम्स कार्बोहायड्रेट तोडण्यास मदत करतात. त्याशिवाय ओवा आणि जिऱ्यातील फायबर पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. फायबरनं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
गट हेल्थसाठी फायदेशीर
जीरे आणि ओव्याच्या पाण्यामुळे पोट आणि पचन तंत्र चांगलं राहतं. त्याशिवाय जीरे आणि ओव्याच्या पाण्यानं शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. ज्यामुळे बॉडी डिटॉक्स होते. त्याशिवाय किडनी आणि लिव्हर साफ करण्यासही या पाण्याची मदत मिळते.