जुन्या काळापासूनच दूध (Milk) हा पोषक तत्वांचा खजिना मानला जात आहे. दूध तब्येतीसाठी वरदान मानलं जातं. दूध आणि मखान्यांचे कॉम्बिनेशन एक उत्तम पर्याय आहे (Makahna With Milk Benefits). दुधात मखाने घालून प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. फक्त शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. (Right Way To Consume Makhana With Milk)
हाडांसाठी फायदेशीर
मखान्यांच्या दुधात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. हे दूध हाडांसाठी बरेच फायदेशीर ठरतं. सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मखान्यांचा आहारात समावेश करू शकता. मखानेयुक्त दुधाचा आहारात समावेश केल्यानं हाडं चांगली राहतात.
थकवा, कमकुवतपणा येणं, अशक्तपणा वाटणं अशा समस्या उद्भवत असतील तर तुम्ही मखानेयुक्त दुधाचे सेवन करू शकता. पटकन ताकद आणि ऊर्जा येण्यासाठी दुधात मखाने किंवा मखान्यांची पावडर घालून पिणं हा उत्तम उपाय आहे. इतकंच नाही तर मखाने घातलेलं दूध प्यायल्यानं मांसपेशींची वाढ चांगली होण्यास मदत होते. गट हेल्थही चांगली राहते. पोटाची सूज, गॅसेसची समस्या कमी करण्यासाठी मखान्यांचे दूध तुम्ही पिऊ शकता.
मखान्यांचे दूध फिजिकल हेल्थसोबतच मेंटल हेल्थवरसुद्धा सकारात्मक परिणाम करते. ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. रात्री झोपण्याआधी तुम्ही मखानेयुक्त दूध प्यायल्यानं तुमची ओव्हरऑल हेल्थ चांगली राहते. मखानेयुक्त दूध प्यायल्यानं फिजिकल हेल्थसोबतच मानसिक आरोग्यवरही चांगला परिणाम होतो. झोपेची गुणवत्ता सुधारते. रात्रीच्या वेळी ग्लासभर दुधात मखाने घालून प्यायल्यानं ओव्हरऑल हेल्थ चांगली राहते.
दूध आणि मखाने मेलाटोनिन हॉर्मोन्स वाढवतात. ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. रात्री झोपण्याआधी या मिश्रणाचे सेवन केल्यास अनिद्रा, अस्वस्थ वाटणं या समस्या दूर होतात. मखान्यांमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे पचनक्रिया तंत्र सुधारते.
दुधात मिसळून प्यायल्यानं पोट साफ राहतं आणि गॅसेसची समस्या दूर होते. दूध आणि मखान्यांचे मिश्रण कोलेस्टेरॉल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करते. ब्लड प्रेशर संतुलित ठेवते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
मखान्यांचे दूध कसे तयार करावे?
मखान्यांचे दूध बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ ग्लास दूध घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा. त्यात ८ ते १० मखाने घाला आणि ५ ते ७ मिनिटं उकळवून घ्या. तुम्ही यात चवीसाठी थोडं मध किंवा गूळ घालू शकता. नंतर कोमट झाल्यावर या दुधाचे सेवन करा.
Web Summary : Makhana with milk offers multiple health benefits, including stronger bones, increased energy, improved digestion, better sleep, and reduced anxiety. It helps manage cholesterol and blood pressure. Prepare by boiling makhana in milk and sweetening with honey or jaggery.
Web Summary : मखाने के साथ दूध पीने से कई स्वास्थ्य लाभ मिलते हैं, जिनमें हड्डियां मजबूत होना, ऊर्जा बढ़ना, पाचन क्रिया बेहतर होना, नींद अच्छी आना और चिंता कम होना शामिल है। यह कोलेस्ट्रॉल और ब्लड प्रेशर को नियंत्रित करने में मदद करता है। इसे बनाने के लिए मखाने को दूध में उबालें और शहद या गुड़ से मीठा करें।