वजनाचा काटा एकदा पुढे सरकत चालला की तो पुन्हा मागे आणणं खूप कठीण होऊन जातं. त्यामुळे मग कित्येकजण डाएट, व्यायाम असं सुरू करतात. बाहेरचं अन्न खाल्ल्याने वजन वाढतं हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे कित्येक जण वजन आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी मग जंकफूड टाळतात. वारंवार विकतचे पदार्थ खाणंही टाळतात. घरीच जेवण करण्यावर त्यांचा भर असतो. पण असं करूनही वजन आणि शुगर मात्र कमी होताना दिसत नाही. त्यामुळे मग नेमकं काय चुकतंय तेच समजत नाही. असं तुमचंही होत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेली ही काही मुख्य कारणं एकदा वाचाच...(major reasons for sugar spike and weight gain instead of having home cooked food)
रोज घरचंच जेवण करूनही वजन, शुगर का वाढत जाते?
याविषयी माहिती सांगणारा एक महत्त्वाचा व्हिडिओ डॉक्टरांनी diabetesreversaldoctor या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या...
१. सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळच्या वेळी घेतला जाणारा चहा किंवा कॉफी. हल्ली वजन आणि शुगर कमी करायची म्हणून कित्येक जण बिनासाखरेचा चहा किंवा कॉफी घेतात. पण त्यामध्ये असणारं दूध आणि चहा- कॉफीसोबत खाल्ली जाणारी बिस्किटं वजन आणि शुगर वाढवतात. त्यामुळे बिनासाखरेचा चहा किंवा कॉफी घ्या आणि बिस्किटं खाणं कटाक्षाने टाळा.
२. नाश्त्यामध्ये आपण उपमा, पोहे, पराठे, इडली, डोसा, पोळी असे कार्बोहट्ड्रेट्स जास्त असणारे पदार्थ खातो. त्यामुळेही शुगर वाढते. त्याऐवजी नाश्त्यामध्ये डाळी, कडधान्ये यांचं प्रमाण वाढवा.
३. जेवणातही भात, पोळ्या किंवा भाकरी यांच्यावर जास्त भर न देता भाज्या, सलाड, कडधान्ये हे पदार्थ खाण्यावर भर द्या.
४. रात्रीच्या जेवणात तर अगदी कटाक्षाने कार्ब्स कमी प्रमाणात घ्या. तुम्ही जेवढं काही खाणार आहात त्याच्या २५ टक्केच कार्ब्स असायला हवं. असं केल्यास वजन, शुगर आणि ट्रायग्लिसराईड सगळंच नियंत्रित राहील.
५. स्वयंपाकातलं तेल नियंत्रित ठेवा. जास्त तेल, तूप घालून केलेला कोणताही पदार्थ तुमचं वजन, शुगर आणि कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो.
Web Summary : Even with home-cooked meals, weight and sugar can increase. Doctors highlight hidden culprits: sugary tea, carb-heavy breakfasts (upma, poha), excessive rice/roti, too many carbs at dinner, and uncontrolled oil usage. Prioritize lentils, vegetables, salads, and limit carbs to 25% at night for better control.
Web Summary : घर का खाना खाने पर भी वज़न और शुगर बढ़ सकते हैं। डॉक्टर बताते हैं छिपे कारण: मीठी चाय, कार्बोहाइड्रेट से भरपूर नाश्ता (उपमा, पोहा), अत्यधिक चावल/रोटी, रात के खाने में ज़्यादा कार्ब्स, और अनियंत्रित तेल का उपयोग। बेहतर नियंत्रण के लिए दालें, सब्जियां, सलाद को प्राथमिकता दें और रात में कार्ब्स को 25% तक सीमित करें।