Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षितचा फेवरिट वरण भात करण्याची खास रेसिपी; वरण-भात खाण्याचे फायदे वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 19:50 IST

Madhuri Dixit's favorite Varan Bhaat recipe : वरण भात खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. वरणात प्रथिनं, कार्ब्स असतात.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित  (Madhuri Dixit) नेने यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेच आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितले आहे तो पदार्थ म्हणजे साधा वरण भात.  माधुरीला आपल्या  साध्या वरण भाताची चव अजून खूप आवडते. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये हा मराठमोळा आणि पारंपारीक पदार्थ त्यांच्या रोजच्या आहारात किती महत्वाचा आहे ते दिसून येतं. (Special Benefits Of Eating Dal Rice)

वरण भात खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. वरणात प्रथिनं, कार्ब्स असतात. भातातही कार्ब्स असतात हे मिश्रण स्नायूंसाठी आवश्यक अमिनो एसिड पुरवते आणि शरीराला  उर्जा मिळते. हा आहार पचायला अतिशय सोपा असतो. आजारी असताना किंवा थकवा जाणवत असताना वरण भाताचे सेवन केल्यास पोटाला आराम मिळतो आणि अपचनाचा त्रास होत नाही. (Madhuri Dixit's favorite Varan Bhaat recipe )

डाळींमध्ये असणारे फायबर्स पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. ज्यामुळे अवेळी खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन  नियंत्रणात राहण्यास मदत होते.डाळी आणि तांदळात असणारे जीवनसत्व आणि खनिजं रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात माधुरी दीक्षितनं वरण भाताला दिलेलं महत्व पुन्हा एकदा सिद्ध करते की आपल्या पारंपारीक पदार्थांमध्ये केवळ चवच नाहही तर आरोग्य आणि साधेपणाचा अनमोल ठेवा दडलेला आहे.

वरण कसे करावे?

एक वाटी तूर डाळ किंवा आवडीनुसार मूग डाळ, मसूर डाळ स्वच्छ धुवून कुकुरमध्ये घाला. त्यात हळद, हिंग आणि अंदाजे  दोन चे अडीच पट पाणी घालून  3 ते 4 शिट्या होईपर्यंत शिजवा. डाळ व्यवस्थित शिजल्यावर घोटून घ्या. एका छोट्या कढईत साजूक तूप किंवा तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. ही फोडणी शिजवलेल्या वरणात घाला. चवीनुसार मीठ आणि आवश्यक असल्यास गूळ घालून एक चांगली उकळ आणा. तयार डाळ तुम्ही भातासोबत सर्व्ह करू शकता.

वरण भात कोणत्या वेळी खाल्ल्यास उत्तम

वरण भात खाण्यासाठी दुपारची वेळ सर्वात उत्तम मानली जाते. दिवसभर आपली चयापचन क्रिया सक्रिय असते. यामुळे दुपारी भात खाल्ल्यास तो सहज आणि लवकर पचतो. वरण भात शरीराला भरपूर कर्बोदके पुरवतो. ही ऊर्जा आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी आणि सक्रिय राहण्यासाठी मदत करते.वरण प्रथिनांनी समृद्ध असते आणि भात कार्ब्स देतो. दुपारच्यावेळी हे मिश्रण खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Madhuri Dixit's favorite Varan Bhat recipe and its health benefits.

Web Summary : Madhuri Dixit loves simple Varan Bhat for its taste and health benefits. It's easily digestible, provides energy, aids weight control, and boosts immunity. It's best consumed at lunchtime.
टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्न