Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > करीना कपूर म्हणते पराठा खाऊनच केली होती झिरो फिगर! ते कसं केलं, वेटलॉसचा सोपा नियम...

करीना कपूर म्हणते पराठा खाऊनच केली होती झिरो फिगर! ते कसं केलं, वेटलॉसचा सोपा नियम...

Kareena Kapoor Zero Figure With Paratha Diet : Kareena Kapoor Khan says she ate 'aloo paratha, white makkhan' even when she was getting size zero body for 'Tashan', Vicky Kaushal is left shocked : Kareena Kapoor lost 20 kg weight despite eating her favourite parathas with ghee. How she did it : पराठा खाऊन वजन कमी करता येऊ शकतं, डाएटिशियन सांगतात कसं ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2025 18:08 IST2025-07-04T17:48:56+5:302025-07-04T18:08:03+5:30

Kareena Kapoor Zero Figure With Paratha Diet : Kareena Kapoor Khan says she ate 'aloo paratha, white makkhan' even when she was getting size zero body for 'Tashan', Vicky Kaushal is left shocked : Kareena Kapoor lost 20 kg weight despite eating her favourite parathas with ghee. How she did it : पराठा खाऊन वजन कमी करता येऊ शकतं, डाएटिशियन सांगतात कसं ते पाहा...

Kareena Kapoor lost 20 kg weight despite eating her favourite parathas with ghee. How she did it Kareena Kapoor Zero Figure With Paratha Diet | करीना कपूर म्हणते पराठा खाऊनच केली होती झिरो फिगर! ते कसं केलं, वेटलॉसचा सोपा नियम...

करीना कपूर म्हणते पराठा खाऊनच केली होती झिरो फिगर! ते कसं केलं, वेटलॉसचा सोपा नियम...

करीना कपूर खान, कपूर घराण्याची लाडकी 'बेबो' तिच्या झिरो फिगरमुळे बॉलिवूडमध्ये फेमस आहे. बॉलिवूडमधील फिट अँड फाईन दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत करीना देखील आहेच. एक काळ (Kareena Kapoor Zero Figure With Paratha Diet) असा होता जेव्हा करीना तिच्या झिरो साइज फिगर आणि फिटनेसमुळे कायम चर्चेत असायची. खरंतर, सेलिब्रिटी फिट राहण्यासाठी कोणते सीक्रेट्स फॉलो करतात, हे जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये करीनाने तिच्या झिरो साइजबद्दलचे खास सिक्रेट शेअर केले आहे, जे ऐकून विकी कौशलसुद्धा चकित झाला(Kareena Kapoor Khan says she ate 'aloo paratha, white makkhan' even when she was getting size zero body for 'Tashan', Vicky Kaushal is left shocked).

२००८ साली आलेल्या करीना कपूरच्या 'टशन' चित्रपटाच्या वेळी तिची फिगर झिरो साइज होती. या इंटरव्ह्यूमध्ये करीना कपूर आणि विकी कौशल यांनी त्यांच्या फूड प्रायोरिटीबद्दल चर्चा केली, ज्यात करीनाने सांगितलं की टशनच्या शूटिंगदरम्यान झिरो साइज मेंटेन करण्यासाठी देखील ती रोज नाश्त्यात पराठे खायची! करीनाच हे विधान ऐकून अनेक लोक आश्चर्यचकित झाले, विशेषत: जे लोक वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी आपले आवडते पदार्थ किंवा पराठे खाणं सोडून देतात. दिल्लीच्या क्लिनिकल डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट रक्षिता मेहरा यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीत खरंच पराठे खाऊन झिरो फिगर साइज (Kareena Kapoor lost 20 kg weight despite eating her favourite parathas with ghee. How she did it) मेंटेन करता येते का? वेटलॉस करताना पराठा कसा खावा? याबद्दल अधिक टिप्स शेअर केल्या आहेत. 

पराठा खाऊन वजन कमी करता येऊ शकतं का?

डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट रक्षिता मेहरा यांचं म्हणणं आहे की, वजन कमी करणं किंवा फिट राहणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे आवडते पदार्थ खाणं सोडून द्यावं. वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच, जर आपण दिवसभरातील घेतलेल्या जाणाऱ्या  एकूण कॅलरीजचे योग्य पद्धतीने नियोजन केलं, तर वेटलॉस करताना देखील पराठा खाणं नक्कीच शक्य आहे.

सुपरस्टार अभिनेत्रीही चेहऱ्याला लावतात ‘हे’ घरगुती लेप, जाहिरातीतल्या महागड्या क्रिम नाहीतर त्या निवडतात...

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

पराठे खाऊन वजन कसे कमी करावे ? 

न्युट्रिशनिस्ट रक्षिता मेहरांचं मत आहे की तुम्ही पराठा खाऊनही वजन कमी करू शकता, मात्र यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 

१. कॅलरीजचं संतुलन राखा :- जर तुम्ही दिवसभरात १५०० ते १८०० कॅलरी घेत असाल, तर एका जेवणात सुमारे ४०० ते ५०० कॅलरी घेऊ शकता. कमी तुपाचा वापर करून तयार केलेला पराठा आणि त्यासोबत दही खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

२. घरीच तयार केलेला पराठा खा :- बाजारात किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणारे पराठे तयार करताना अनेकदा खूप जास्त तूप, तेल आणि अधिक मिठाचा वापर केला जातो. याउलट, घरी थोड्या प्रमाणात तुप किंवा तेल लावून पराठा तयार केला, तर तो टेस्टी तर होतो, शिवाय वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.  

३. फायबरयुक्त पराठा :- पराठा आणखी हेल्दी करण्यासाठी त्यात फायबरयुक्त पदार्थ घालू शकता. यासाठी फक्त बटाटाच नाही, तर त्यात गाजर, पालक, कांदा आणि इतर पौष्टिक भाज्या मिसळून पराठा तयार करा. अशा प्रकारचे फायबरयुक्त पराठे पचनासाठी उपयुक्त असतात आणि पोटही दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं तसेच वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

४. एक्सरसाइज - अ‍ॅक्टिव्हिटी करा :- वजन कमी करताना आपण पराठा खाऊ शकता, पण त्यासोबत एक्सरसाइज - अ‍ॅक्टिव्हिटी करणंही तितकंच गरजेचं आहे. यासाठी नियमित योगा, चालणे किंवा एक्सरसाइज करा. शारीरिक हालचालींमुळे मेटाबॉलिझम वाढतं आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

५. ओव्हरइटिंग टाळा :- पराठा खाऊनही वजन कमी करणं किंवा नियंत्रणात ठेवणं तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही खाण्यात संयम पाळाल. ओव्हरइटिंग करू नका, जास्त लोणी किंवा बटर घालू नका आणि खाल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर थोडा वेळ चालल्यास अन्न सहज पचतं आणि आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

फेशियल हेअर रिमूव्हलचा घरगुती उपाय! वेदना न होता केस निघतील सहज - वॅक्सिंग, थ्रेडींग विसरा!

पराठा खाऊनही वजन कमी करणं शक्य कारण... 

न्युट्रिशनिस्ट रक्षिता मेहरा यांचं म्हणणं आहे की, आपल्यापैकी अनेकांना वाटतं की वजन कमी करण्यासाठी भात, पोळी, पराठा किंवा आपले आवडते पदार्थ खाणं सोडून द्यावं लागत. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरंतर, तुम्ही काय, किती प्रमाणात, कसं आणि केव्हा खाताय, या गोष्टींचं योग्य नियोजन केल्यास सगळेच पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

Web Title: Kareena Kapoor lost 20 kg weight despite eating her favourite parathas with ghee. How she did it Kareena Kapoor Zero Figure With Paratha Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.