Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरंच की काय? करण जोहर सांगतो ‘ऑझेम्पिक’ नव्हे, भात-बटाटे खाऊनच ‘असं’ केलं वजन कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2026 14:30 IST

Karan Johar rice and potato diet : Karan Johar weight loss journey : Karan Johar gluten intolerance diet : भात आणि बटाटे खाऊनही वजन कसं कमी होऊ शकतं त्याचे सिक्रेट सांगतोय करणं जोहर...

"बॉलिवूडचा 'किंग ऑफ मेकिंग' म्हणून ओळखला जाणारा करण जोहर सध्या त्याच्या चित्रपटांमुळे नाही, तर त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही करण जोहर आजच्या तरुण अभिनेत्यांना टक्कर देईल इतका फिट आणि हँडसम दिसतोय. इतकंच नाही तर, करण जोहरच्या ट्रान्सफॉर्मेशनने अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे. एकेकाळी वजनामुळे ट्रोल होणाऱ्या करण जोहरने कमाल फिटनेस मिळवत स्वतःला पूर्णपणे बदललं. अनेकांना वाटतं की सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स, भात आणि बटाटे पूर्णपणे सोडतात. पण करण जोहरच्या बाबतीत हे अगदी उलट आहे. त्याने चक्क आपल्या आवडत्या भारतीय अन्नाचा समावेश करून वजन कमी केलं आहे(Karan Johar gluten intolerance diet).

विशेष म्हणजे त्याने वजन कमी करण्यासाठी कोणताही फॅन्सी डाएट किंवा अत्यंत महागडे फूड प्लॅन्स न वापरता, अगदी साध्या आणि घरगुती पदार्थांचा आधार घेतल्याचं सांगितलं जातं. शक्यतो वेटलॉस करण्यासाठी बहुतेकजण भात आणि बटाटे यांसारखे पदार्थ खाणच सोडून देतात, परंतु करणं म्हणतो, वेटलॉस करण्यासाठी भात आणि बटाटा तर माझे दोस्तच झाले होते. भात आणि बटाट्या सारखेच नेहमीचे पदार्थ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास (how Karan Johar lost weight) वजन कमी होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे करण जोहर...भात आणि बटाटे खाऊनही वजन कमी होऊ शकतं, हे करणने सिद्ध करून दाखवलंय. हे ऐकून अनेकदा आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो, मग करण जोहरचं हे 'मॅजिक डाएट' नेमकं आहे तरी काय पाहूयात... 

करणं जोहरने नेमकं कसं केल वेटलॉस?

करण जोहरने ओझेंपिक (Ozempic) किंवा वजन कमी करणारी इतर कोणतीही औषधे घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्याने ऑस्ट्रियातील 'Vivamayr' या मेडिकल हेल्थ रिसॉर्टला भेट दिली, जिथे त्याला त्याच्या शरीराबद्दल काही नवीन गोष्टी समजल्या. काइनेसियोलॉजी चाचणीनंतर (Kinesiology Test) करणला समजले की तो ग्लूटेन (Gluten) आणि लॅक्टोज (Lactose) इनटॉलरंट आहे. वजन कमी करण्यासाठी तो आतापर्यंत चपाती/रोटी खात होता आणि भातापासून लांब राहत होता, जे त्याच्या शरीरासाठी चुकीचे ठरत होते. एकदा शरीराला काय मानवते हे समजल्यावर त्याने चपाती सोडून भात आणि बटाटे आपल्या आहारात समाविष्ट केले. त्याने म्हटले आहे की, "खरंतर, भात आणि बटाटे हे माझे खरे मित्र आहेत."

टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या असतात घरातील ५ वस्तू! तुम्ही ‘त्या’ रोज स्वच्छ करता की घाणीतच करता काम...

तो पूर्वी अत्यंत 'हाय प्रोटीन' डाएटवर होता, ज्यामध्ये तो फक्त प्रोटीनयुक्त पदार्थ खात असे. या आहारात इतर कार्बोहायड्रेट्सना अजिबात स्थान नव्हते, जे त्याच्यासाठी शारीरिकदृष्ट्या खूप कठीण होते. यासोबतच, त्याला थायरॉईडची समस्या असल्याचेही निदान झाले, ज्यासाठी त्याने औषधे घेतली. सोबतच त्याने आहारातून साखर पूर्णपणे बंद केली आणि दुधाऐवजी बदामाचे दूध पिण्यास सुरुवात केली. परंतु योग्य संतुलित आहार, साखर खाणे सोडणे, थायरॉईडवर उपचार आणि स्वतःच्या शरीराला काय मानवते हे ओळखून केलेल्या बदलांमुळे करण जोहरचे वजन हळूहळू कमी झाले.

काय आहे 'ग्लूटेन' आणि 'लॅक्टोज' इनटॉलरन्स?

१. ग्लूटेन इनटॉलरन्स :- ग्लूटेन हे गहू, जव आणि राईमध्ये आढळणारे एक प्रथिन आहे. हे न मानवणाऱ्या लोकांना चपाती, ब्रेड किंवा पास्ता खाल्ल्यावर पोटदुखी, सूज किंवा थकवा जाणवू शकतो.

२. लॅक्टोज इनटॉलरन्स :- लॅक्टोज दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. ज्यांना हे सहन होत नाही, त्यांना दूध, पनीर किंवा लोणी खाल्ल्यानंतर पोट खराब होणे किंवा गॅस होण्याचा त्रास होतो.

ग्लूटेन इनटॉलरन्स (Gluten Intolerance) असलेल्या लोकांसाठी खालील पदार्थ खाणे सुरक्षित आणि फायदेशीर असते. 

१. तांदूळ (पांढरा किंवा ब्राऊन) :- तांदूळ हा ग्लूटेन - फ्री असून पचायला हलका असतो.

२. बटाटा :- बटाटे हे उर्जेचा चांगला स्रोत आहेत आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.

३. मका :- मक्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात बिनधास्त करू शकता.

४. बाजरी, ज्वार, नाचणी :- ही तृणधान्ये केवळ ग्लूटेन - फ्री नाहीत तर आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानली जातात.

५. क्विनोआ :- हे एक उत्तम सुपरफूड असून ग्लूटेन - फ्री आहारासाठी चांगला पर्याय आहे.

६. सातूचे पीठ :- उपवासाला वापरले जाणारे सातूचे पीठ ग्लूटेन इनटॉलरन्स असलेल्यासाठी फायदेशीर आहे.

पाठ-कंबर दुखीपासून हवाय कायमचा आराम? अभिनेत्री भाग्यश्रीचे हे ५ घरगुती उपाय तुम्हाला देतील इन्स्टंट रिलीफ... 

लॅक्टोज इनटॉलरन्स (Lactose Intolerance) असलेल्या लोकांसाठी खालील पदार्थ खाणे फायदेशीर आहे. 

१. बदाम, सोया किंवा ओट मिल्क :- दुधाला पर्याय म्हणून तुम्ही बदाम (Almond), सोया किंवा ओट मिल्क वापरू शकता, जे पूर्णपणे लॅक्टोज-मुक्त असतात.

२. लॅक्टोज - फ्री दूध :- बाजारामध्ये खास प्रक्रिया केलेले लॅक्टोज-फ्री दूध मिळते, ज्याचा वापर तुम्ही नियमित दुधाऐवजी करू शकता.

३. सोया किंवा नारळाचे दही :- दुग्धजन्य दह्याऐवजी सोया मिल्क किंवा नारळाच्या दुधापासून बनवलेले दही आरोग्यासाठी सुरक्षित आणि चविष्ट असते.

भात आणि बटाटा खाऊन कसे केले वजन कमी... 

जर बटाटा आणि भात यांसारखे साधे, ग्लूटेन - फ्री आणि हलके पदार्थ योग्य पद्धतीने खाल्ले, तर ते वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. करण जोहरने त्याच्या आहारात यांचा अतिशय विचारपूर्वक वापर केला. बटाटा आणि भात योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यामुळे करणला बराच वेळ 'पोट भरलेले' असल्याचे जाणवले. यामुळे त्याला वारंवार भूक लागली नाही आणि विनाकारण काहीही खाण्याची क्रेविंग्स कमी झाली. भात आणि बटाटा हे दोन्ही पदार्थ ग्लूटेन - फ्री असल्याने ज्यांना गव्हाची किंवा ग्लूटेनची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी वेटलॉस करण्यासाठी हे सर्वोत्तम अन्नपदार्थ आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Karan Johar reveals rice-potato diet secret to weight loss.

Web Summary : Karan Johar lost weight eating rice and potatoes, avoiding gluten and lactose after a Kinesiology test. He focused on balanced diet, addressed thyroid issues, and eliminated sugar, proving simple foods can aid weight loss.
टॅग्स :वेट लॉस टिप्सकरण जोहरफिटनेस टिप्स