Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > हिवाळ्यात दही खाल्ल्यावर सर्दी होईल असं वाटतं? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला- दही खायचं तर... 

हिवाळ्यात दही खाल्ल्यावर सर्दी होईल असं वाटतं? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला- दही खायचं तर... 

Health Tips About Eating Curd: हिवाळ्यात थंड वातावरणामुळे दही खावं की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. बघा त्यामागचं आहारतज्ज्ञांनी दिलेलं खास उत्तर..(is it good to eat curd in winter season?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2024 09:15 IST2024-12-26T09:13:10+5:302024-12-26T09:15:02+5:30

Health Tips About Eating Curd: हिवाळ्यात थंड वातावरणामुळे दही खावं की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. बघा त्यामागचं आहारतज्ज्ञांनी दिलेलं खास उत्तर..(is it good to eat curd in winter season?)

is it good to eat curd in winter season, eating curd in winter season can cause cold and cough? | हिवाळ्यात दही खाल्ल्यावर सर्दी होईल असं वाटतं? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला- दही खायचं तर... 

हिवाळ्यात दही खाल्ल्यावर सर्दी होईल असं वाटतं? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला- दही खायचं तर... 

Highlightsआहारतज्ज्ञांनी दही खाण्याविषयी सांगितलेली एक गोष्ट म्हणजे हिवाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूमध्ये दही खायचं असेल तर....

काही काही पदार्थ असे असतात की ते कधी खावे, कोणत्या ऋतूमध्ये खावे, कसे खावे याविषयी अनेकांच्या मनात नेहमीच संभ्रम असतो. त्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे दही. दही हे थंड असतं. त्यामुळे ते हिवाळ्यात खाणं टाळलं पाहिजे. कारण हिवाळ्यात दही  खाल्लं तर ते बाधतं आणि त्यामुळे सर्दी होते, असं अनेकांना वाटतं. आपलं दह्याबाबत हे जे काही मत आहे, ते कितपत खरं आहे आणि हिवाळ्यात दही खाणं म्हणजे खरंच सर्दीला निमंत्रण देण्यासारखं आहे का? (is it good to eat curd in winter season?) याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती पाहा...(can eating curd in winter season cause cold and cough?)

 

हिवाळ्यात दही खाल्ल्यामुळे सर्दी होते का?

हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली माहिती sehatnamawithrajinder या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

चष्मा-गॉगलच्या काचांना लगेच स्क्रॅचेच पडतात? २ टिप्स, चष्मा जुना झाला तरी काचा राहतील नव्यासारख्या

यामध्ये आहारतज्ज्ञ सांगत आहेत की जर तुम्हाला दही खायचं असेल तर तुम्ही हिवाळ्यातही खाऊ शकता. कारण दही हे थंड नसून उष्ण आहे. त्यामुळे खरंतर उन्हाळ्याच्या दिवसांत दही खाणं टाळलं पाहिजे आणि हिवाळ्यात दही खाल्लं पाहिजे. ताक हे थंड असतं. त्यामुळे ताक उन्हाळ्यात दही खाण्याऐवजी ताक प्यावं.

 

जर हिवाळ्यात दही खायचं असेल तर ते खाण्याची योग्य वेळ आहे सकाळची. कारण यावेळी खाल्लेलं दही बाधत नाही. शिवाय दिवसभरात आपली जी काही शारिरीक हालचाल होेते, त्यामुळे ते व्यवस्थित पचतं. रात्री उशिरा दही खाणं टाळावं. पण जर तुम्ही रात्रीचं जेवण साधारण ६: ३० ते ७ च्या दरम्यान करत असाल तर त्यामध्ये तुम्ही दही खाऊ शकता. 

प्रियांका चोप्रासारखी चमकदार त्वचा पाहिजे? तिचा सगळ्यात आवडीचा स्वस्तात मस्त बॉडी स्क्रब वापरा

आहारतज्ज्ञांनी दही खाण्याविषयी सांगितलेली आणखी एक गोष्ट म्हणजे हिवाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूमध्ये दही खायचं असेल तर नेहमी ताजं म्हणजेच फ्रिजमध्ये न ठेवलेलं दही खावं. असं ताजं दही बाधत नाही आणि त्यामुळे सर्दीही होत नाही.  


 

Web Title: is it good to eat curd in winter season, eating curd in winter season can cause cold and cough?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.