Join us
Daily Top 2Weekly Top 5

PCOS असताना वेटलॉस करणे होते कठीण! करा फक्त ५ बदल - वजन उतरेल झरझर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2025 14:36 IST

Include these 5 effective micro habits in daily routine for pcos weight loss : daily routine habits for pcos weight loss : simple habits for pcos weight loss : पी.सी.ओ.एस.मुळे वाढलेलं अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी ५ उपाय...

पी.सी.ओ.एस. (PCOS - Polycystic Ovary Syndrome) ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य हार्मोनल समस्या आहे. आजच्या काळात, भारतात प्रत्येक ५ किशोरवयीन मुलींपैकी १ आणि जगभरातील प्रजननक्षम वयाच्या अंदाजे ६ ते १३ % महिलांना या समस्येचे निदान होते. अनेक महिलांना या समस्येमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, आणि यापैकी सर्वात मोठी अडचण म्हणजे वजन कमी न होणे किंवा सतत वजन वाढणे.पी.सी.ओ.एस. असलेल्या महिलांना इन्सुलिन प्रतिरोध आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या समस्यांमुळे वजन कमी करणे अनेकदा अशक्य वाटू लागते(Include these 5 effective micro habits in daily routine for pcos weight loss).

जिममध्ये तासंतास घाम गाळून किंवा डाएटवर नियंत्रण ठेवूनही वजन जैसे थे अगदी तसेच राहते, ज्यामुळे अनेकदा नैराश्य येते. पण, काळजी करू नका! पी.सी.ओ.एस. असताना वजन कमी करणे अशक्य नाही, फक्त त्यासाठी योग्य आणि वेगळ्या दृष्टिकोनाची तसेच लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल करण्याची गरज आहे. लाईफस्टाईलमध्ये काही छोटे पण महत्त्वाचे बदल करून तुम्ही तुमच्या हार्मोन्सना संतुलित ठेवू शकता आणि अगदी सहज वजन कमी करू शकता. पी.सी.ओ.एस.मुळे वाढलेलं (daily routine habits for pcos weight loss) अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आणि ते (simple habits for pcos weight loss) नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमके कोणते उपाय करावे लागतील ते पाहूयात. 

पी.सी.ओ.एस. (PCOS) असताना वजन कमी करायचे असेल करा डेली रुटीनमध्ये ५ बदल... 

१. हाय प्रोटीनयुक्त नाश्ता :- जर तुम्हाला PCOS चे निदान झाले असेल आणि तुमचे ध्येय वजन कमी करण्याचे असेल, तर नाश्त्यामध्ये प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश भरपूर प्रमाणांत असणे गरजेचे असते. सकाळी रोज नाश्त्यात ३५ ग्रॅम प्रथिने घेण्याचा प्रयत्न करा. दिवसाची सुरुवात ३५ ग्रॅम प्रथिनांनी केल्यास तुमचा चयापचय क्रियेचा वेग जलद होऊ शकतो. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते. तसेच, दिवसभर होणारे फूड क्रेव्हिंग्ज नियंत्रित ठेवण्यासाठी आपली  ब्लड शुगर स्थिर राहू शकते.

जिरेही तापदायक!  'या' ६ समस्या असतील तर महिलांनी अजिबात खाऊ नयेत जिरे....

२. कॉफीऐवजी 'स्पीयरमिंट टी' (Spearmint Tea) प्या :- आहारतज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, कॉफीऐवजी स्पीयरमिंट टी पिण्यास सुरुवात करा. कॉफी शरीरातील स्ट्रेसचे हार्मोन वाढवू शकते. यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप घेणे कठीण होऊ शकते. याचा परिणाम म्हणून, इन्सुलिन संवेदनशीलता वाढते  ज्यामुळे तुमच्यासाठी वजन कमी करणे अधिक कठीण होऊ शकते. कॉफीऐवजी स्पीयरमिंट टी प्यायल्याने टेस्टोस्टेरोन हार्मोन कमी होण्यास आणि हार्मोन संतुलित ठेवण्यास मदत मिळते.

जावित्रीचा चहा तुम्हाला थंडीतही ठेवतो सुपरफिट! चहा ‘असा’ करा आणि हिवाळ्यात लांब ठेवा सगळेच आजार...

३. जेवणानंतर थोडे चाला :- पी.सी.ओ.एस. (PCOS) असेल तर वजन कमी करण्यासाठी चालणं अधिक फायदेशीर ठरु शकत. प्रत्येक जेवणानंतर १० मिनिटांचा वॉक केल्याने बरेच फायदे मिळतात. चालण्याने वजन कमी होण्यासोबतच ब्लड शुगरचे नियंत्रण देखील अधिक चांगले राहते.

४. बॉक्स ब्रीदिंगचा सराव करा :- वेटलॉस करण्यासाठी आपल्या डेली रुटीनमध्ये बॉक्स ब्रीदिंगचा सराव करा. नावाप्रमाणेच, हा एक प्रकारचा श्वास घेण्याचा व्यायाम आहे. यामुळे तुमचे स्ट्रेस हार्मोनचे उत्पादन कमी होण्यास मदत होते. बॉक्स ब्रीदिंग करण्यासाठी चार सेकंदांसाठी श्वास आत घ्या. चार सेकंदांसाठी श्वास रोखून ठेवा. नंतर चार सेकंदांसाठी श्वास सोडा. आणि शेवटी चार सेकंदांसाठी श्वास रोखून ठेवा. 

५. जेवणाच्या ताटाचे असे करा विभाजन :- वजन कमी करण्यामध्ये आहार (Diet) महत्त्वाची भूमिका बजावतो. अशावेळी, रोजचा आहार संतुलित असणे गरजेचे  असते. रोजच्या आहारात एक चतुर्थांश भाग (१/४) प्रथिने असावेत. एक चतुर्थांश भाग (१/४) कार्ब्स असावेत आणि अर्धा भाग (१/२) भाज्या (Vegetables) आणि  थोडे फॅट्स असावेत. या पद्धतीला 'पीसीओएस वेट लॉस प्लेट मेथड' असे म्हटले जाते, जे PCOS मध्ये वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Weight loss with PCOS: 5 simple daily routine changes that work.

Web Summary : PCOS makes weight loss difficult. Incorporate these five daily habits: high-protein breakfast, spearmint tea, post-meal walks, box breathing, and balanced meals. These changes help balance hormones and promote effective weight management.
टॅग्स :वेट लॉस टिप्सहोम रेमेडीआरोग्यहेल्थ टिप्सपीसीओएस आणि पीसीओडी