Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उन्हाळ्यात वजन कमी करता येतं? ६ टिप्स, वजनही घटेल-डिहायड्रेशनही होणार नाही-पाहा कसं..

उन्हाळ्यात वजन कमी करता येतं? ६ टिप्स, वजनही घटेल-डिहायड्रेशनही होणार नाही-पाहा कसं..

Weight Loss In Summer : उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही सोप्या गोष्टी फॉलो करून तुम्ही वजन कमी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:24 IST2025-02-14T11:49:13+5:302025-02-14T15:24:49+5:30

Weight Loss In Summer : उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही सोप्या गोष्टी फॉलो करून तुम्ही वजन कमी करू शकता.

How to weight loss in summer follow these tips | उन्हाळ्यात वजन कमी करता येतं? ६ टिप्स, वजनही घटेल-डिहायड्रेशनही होणार नाही-पाहा कसं..

उन्हाळ्यात वजन कमी करता येतं? ६ टिप्स, वजनही घटेल-डिहायड्रेशनही होणार नाही-पाहा कसं..

Weight Loss In Summer : वजन कमी करणं ही अनेकांनी गरज झाली आहे. कारण आजकाल जास्तीत जास्त लोकं वजन वाढल्यामुळे चिंतेत असतात. एकदा वजन वाढलं की, कमी करणं अवघड होतं. अशात उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी काय करावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही सोप्या गोष्टी फॉलो करून तुम्ही वजन कमी करू शकता.

तसा गरमीचा मौसम वजन कमी करण्यासाठी चांगला मानला जातो. तापमान जास्त असल्याने या दिवसात खाणंही कमी होतं. या दिवसात आपल्या डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास  तुम्हाला वजन कमी करण्यास चांगली मदत होईल. 

उन्हाळ्यात वजन कमी करण्याचे उपाय

1) सॅलड खाणे तुमच्यासाठी फायद्याचं राहील. गरमीच्या दिवसात काकडी, गाजर, टोमॅटो यांचं सॅलड पोषण देण्यासोबतच पाण्याची कमतरताही भरुन काढतं. सॅलड खाल्ल्याने तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही फास्ट फूडपासून लांब राहाल.

2) दही आणि ताक या दिवसात भरपूर घ्या. याचे अनेक फायदे आहेत. याने शरीरातील वाढलेलं तापमान कमी होण्यास मदत होईल आणि तुमचं वजनही कमी होईल. तसेच यामुळे तुमचं पोटही भरलेलं राहील.   

3) हिरव्या पाले भाज्यांचं सेवन करा. या दिवसात लौकी, गिलकं यांसारख्या भाज्या फायदेशीर असतात. या तुमचं वजन कंट्रोल करतात आणि सोबतच पचनक्रियाही चांगली राहाते. 

4) उन्हाळ्यात खरबूज आणि कलिंगड खाणे सुद्धा अधिक फायद्याचं ठरतं. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आंब्यांपासून लांबंच राहीलेलं बरं. 

5) उन्हाळ्यात लिंबू पाण्याचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. याने शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत मिळते.

6) दिवसभर भरपूर पाणी पिणं हे फार गरजेचं असतं. वजन कमी करायचं असेल तर दिवसातून 3 ते 4 लीटर पाणी प्यावं.

Web Title: How to weight loss in summer follow these tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.