Honey for Weight Loss : अनेक एक्सपर्ट्सना तुम्ही शुगर म्हणजेच साखर कमी खाण्याचा सल्ला देताना ऐकलं असेल. त्यांचा दावा असतो की, जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यानं किंवा साखरेचा वापर केल्यानं लठ्ठपणा वाढतो. तसेच हृदयरोग, डायबिटीस, कॅन्सर आणि लिव्हरसंबंधी आजारांचा धोकाही वाढतो. यामुळे शरीरात इतरही अनेक समस्या होतात.
WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसारही शुगरचा वापर कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर शुगरचा वापर अधिक केला तर वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. अशात एक्सपर्ट साखरेऐवजी मधाचा वापर करण्याचा सल्ला देतात. मध हे एक नॅचरल स्वीटनर आहे आणि याचे आरोग्याला कितीतरी फायदे मिळतात.
मध साखरेपेक्षा वेगळं असतं. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिज असतात. तर साखरेमध्ये हे कमी असतात. मधाचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. ज्यामुळे हृदयरोग आणि टाइप २ डायबिटीसचा धोकाही कमी असतो. सोबतच मध वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. अशात मधाचे फायदे जाणून घेऊया.
वजन कमी करतं
मधाला आयुर्वेदात बेस्ट फॅट बर्नर मानलं जातं. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे मेटाबॉलिज्म बूस्ट करतात, ज्यामुळे कॅलरी बर्न होण्याचा प्रक्रिया वेगानं होते. अशात तुम्ही रोज एक चमचा मध कोमट पाण्यात टाकून पिऊ शकता. यात लिंबाचा रसही टाकू शकता. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्याल तर अधिक फायदा मिळेल.
ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल
मध चाखल्यानं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित केली जाऊ शकते. जर तुम्ही याचा योग्य प्रमाणात वापर केला तर यातील अॅंटी-ऑक्सिडेंट मेटाबॉलिक सिंड्रोम आणि टाइप २ डायबिटीसपासून बचाव करण्यास मदत करतात.
हार्ट हेल्थ
मध हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं. यात ब्लड प्रेशर कमी करणे, ब्लड फॅट लेव्हल सुधारणे, हार्ट रेट कंट्रोल करणे आणि हेल्दी सेल्स नष्ट होण्यापासून रोखण्यास मदत मिळते. या सगळ्या गोष्टींमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
त्वचेसाठी फायदेशीर
मधात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे त्वचेला आतून पोषण देतात. ज्यामुळे त्वचेवरील डाग, पिंपल्स, सुरकुत्या दूर होण्यास मदत मिळते. त्वचा टाइट होते, फ्रेश आणि चमकदार दिसते.
जळजळ कमी होते
मधातील अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-इन्फ्लामेटरी, अॅंटी-ऑक्सिडेंट गुण जळजळ कमी करण्यास आणि जखमा लवकर भरण्यास मदत करतात. मधामुळे खोकला कमी करण्यासही मदत मिळते.