सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये, जाडेपणा आणि पोटावरील वाढती चरबी यामुळे अनेकजण हैराण आहेत. हे वाढलेल वजन आणि पोटाची पुढे आलेली ढेरी मधुमेह, हृदयविकार आणि ब्लड प्रेशर यांसारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देते. ही हट्टी चरबी कमी करण्यासाठी आपण अनेकदा कडक डाएट आणि तेल-तूप पूर्णपणे खाणेच सोडतो. वेटलॉस आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी साजूक तूप खाणे फायदेशीर ठरते, असे म्हटलं तर आपला विश्वासच बसत नाही(how to use ghee to burn belly fat).
अनेक फिटनेस तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांच्या मते, दररोज योग्य प्रमाणात साजूक तूप आपल्या आहारात घेतल्यास शरीराला आवश्यक ती एनर्जी मिळते आणि अनावश्यक शरीरात साठलेली चरबी कमी होते. त्यामुळे वेटलॉस आणि पोटाची ढेरी कमी (ghee for weight loss) करायची असेल, तर तूप टाळायचं नाही उलट योग्य पद्धतीने आहारात समाविष्ट करणे फायद्याचे ठरते.
साजूक तूप खाऊन होईल वेटलॉस आणि बेली फॅट्स होईल कमी...
तूप म्हणजे फॅट, आणि फॅट म्हणजे वजन वाढ असा आपला सर्वसामान्य समज असतो. पण खरंतर, योग्य प्रमाणात घेतलेलं साजूक तूप हे वजन कमी करण्यास आणि विशेषतः पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करू शकतं. साजूक तूपामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, कॉन्जुगेटेड लिनोलिक ऍसिड (CLA) आणि नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स मेटाबॉलिझमचा वेग वाढवतात, पचन सुधारतात आणि पोटातील फॅट बर्न होण्याची प्रक्रिया गतीमान करतात. शिवाय तूपात असलेले ब्युटरिक अॅसिड आतड्यांचे आरोग्य सुधारून शरीरातील चरबीचे साठे कमी करण्यात मदत करते.
पोट साफ न होण्याची चिंता सोडा! 'हे' जादुई पान रात्री चावून खा - आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय...
डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन यांच्या मते, तूप थेट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नाही, पण ते आहारात समाविष्ट केले जाऊ शकते. साजूक तूप आपण भाजीमध्ये किंवा गरम पाण्यात मिसळून त्याचा आहारात समावेश करु शकतो. यामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढण्यास मदत मिळते, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तूप हे नेहमी एका मर्यादित प्रमाणातच खाणे आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरु शकते. तुपामध्ये आरोग्यदायी फॅट्स, व्हिटॅमिन-ए, ई, डी आणि के सारखे पोषक घटक फार मोठ्या प्रमाणात असतात तसेच यात अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्मही असतात. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी ते योग्य पद्धतीने खाणे आवश्यक आहे.
फॅटी लिव्हरचा त्रास? रोजच्या आहारात करा ' एवढाच ' बदल - गंभीर दुखणे होईल कमी...
तुपामध्ये ब्यूटिरिक ॲसिड असते. साजूक तूप खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि पचन प्रक्रिया अधिक चांगली करण्यास मदत मिळते. साजूक तूप खाल्ल्याने पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अतिसार, फॅटी लिव्हर, लॅक्टोज इनटॉलरन्स आणि पचनशक्ती कमकुवत असताना साजूक तूप खाणे टाळावे. चमचाभर साजूक तूप रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास किंवा गरम पाण्यात टाकून घेतल्यास पचन प्रक्रिया सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.