Herbal Drink for Weight Loss : आजकाल जास्तीत जास्त लोक आपलं वाढलेलं वजन कमी करण्याच्या मागे लागलेले आहेत. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाईज केल्या जातात, वेगवेगळे ड्रिंक्स प्यायले जातात. अनेक हर्बल ड्रिंक्स वजन कमी करण्यात मदत करतात. तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आज आम्ही एका अशाच ड्रिंकबाबत तुम्हाला सांगणार आहोत.
वेलचीचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. सोबतच मुखवास म्हणूनही वेलची खाल्ली जाते. वेलचीचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. वेलची खाल्ल्यानं डायजेस्टिव सिस्टीम मजबूत होतं आणि इम्यूनिटी वाढते. तसेच वेलचीनं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
कसं बनवाल खास ड्रिंक?
वेलचीचं वजन कमी करणारं कास ड्रिंक बनवण्यासाठी वेलचीच्या बीया एक ग्लास पाण्यात मिक्स करा आणि हे पाणी उकडून प्या. हे ड्रिंक प्यायल्यानं वजन तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण याचा जास्त प्रमाणात सेवन करू नये. असं केलं तर काही नुकसानही होऊ शकतात.
वजन होईल कमी
वेलचीच्या बियांचं पाणी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. सोबतच या पाण्यानं पचन तंत्रही मजबूत राहतं. हे पाणी प्यायल्यास मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. मात्र, केवळ हे पाणी पिऊन वजन कमी होईल अशी अपेक्षा करणं जरा जास्त होईल. त्यामुळे आहार आणि एक्सरसाईजही महत्वाची ठरते.
पचन तंत्र चांगलं राहतं
वेलचीमध्ये पचनास मदत करणारे एंझाइम्स असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात. जर तुम्हाला पचनासंबंधी समस्या राहत असतील तर हे ड्रिंस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या पाण्यानं डायजेस्टिव सिस्टीम मजबूत होते आणि अपचन, ब्लोटिंग, गॅस, छातीत जळजळ अशा समस्या दूर होतात.
डायबिटीस होईल कंट्रोल
वेलचीचं पाणी डायबिटीस कंट्रोल करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. यात असे काही तत्व असतात जे तुमची ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करतात. जर नियमितपणे हे पाणी प्याल तर जेवणानंतर अचानक ग्लूकोज लेव्हल वाढणार नाही.
हृदयासाठी फायदेशीर
एका रिपोर्टनुसार, वेलचीच्या बियांचं पाणी प्यायल्यास हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. यानं ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत मिळते. या पाण्यानं हृदयाला होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी केला जाऊ शकतो.
चिंता कमी होईल
जर तुम्ही वेलचीच्या बियांचं पाणी नियमितपणे प्याल तर यानं शरीराचं आरोग्य तर चांगलं राहिलच, सोबतच मानसिक आरोग्यालाही फायदे मिळतील. या पाण्यानं चिंता, तणाव कमी करण्यास मदत मिळते.