Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट-कंबरेची चरबी वाढलीये? १ चमचा मेथीच्या दाण्यांचा सोपा उपाय, मेणासारखी वितळेल चरबी

पोट-कंबरेची चरबी वाढलीये? १ चमचा मेथीच्या दाण्यांचा सोपा उपाय, मेणासारखी वितळेल चरबी

How TO Reduce Belly Fat Using Fenugreek : हेल्थ एक्सपर्ट्ससुद्धा मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला देतात. तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपल्या डेली रूटीनमध्ये मेथीच्या पाण्याचा समावेश करू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:55 IST2025-09-07T16:48:21+5:302025-09-07T16:55:49+5:30

How TO Reduce Belly Fat Using Fenugreek : हेल्थ एक्सपर्ट्ससुद्धा मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला देतात. तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपल्या डेली रूटीनमध्ये मेथीच्या पाण्याचा समावेश करू शकता. 

How To Reduce Belly Fat Using Fenugreek : Fenugreek Benefits To Lose Fat And Weight Loss | पोट-कंबरेची चरबी वाढलीये? १ चमचा मेथीच्या दाण्यांचा सोपा उपाय, मेणासारखी वितळेल चरबी

पोट-कंबरेची चरबी वाढलीये? १ चमचा मेथीच्या दाण्यांचा सोपा उपाय, मेणासारखी वितळेल चरबी

वजन कमी करण्यासाठी किंवा पोट कमी  करण्यासाठी तुम्ही चांगाल पर्याय शोधत असाल तर मेथीचे दाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मेथीच्या दाण्यांमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, फायबर गॅलेक्टोमॅनन, सैपोनिन आणि ट्रायगोनेलिन असे एक्टिव्ह कम्पाऊंड्स असतात. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होऊ  गुड कोलेस्टेरॉल वाढते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्यही चांगली राहते. हेल्थ एक्सपर्ट्ससुद्धा मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला देतात. तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपल्या डेली रूटीनमध्ये मेथीच्या पाण्याचा समावेश करू शकता.  (Fenugreek  Benefits To Lose Fat)

रिसर्चननुसार पोट कमी करण्यासाठी तसंच बेली फॅट घटवण्यासाठी मेथीचे दाणे फायदेशीर ठरतात. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो. यातील एंटी इन्फ्लेमेटरी आणि एंटी ऑक्सिडेंट्स गुण शरीरातील टॉक्सिन्स फ्लश आऊट करण्यास मदत करतात. मेथीच्या दाण्यांमुळे पुरूषांमधील टेस्टोस्टेरॉल लेव्हल वाढते. यामुळे स्पर्म क्वालिटीवरही परिणाम होतो. मेथीच्या बीया टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन वाढवण्यासोबतच स्पर्म क्वालिटी सुधारण्यास मदत करतात. (Ref) मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात.पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी याचे सेवन केले जाते. ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि ब्लोटींग,अपचनाची समस्या उद्भवत नाही. मेथीच्या बियांचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. डायबिटीसचे रुग्ण मेथीचे पाणी पिऊ शकतात. 

मेथीच्या पाण्याचे सेवन कसे करावे?

रात्री एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी गाळून या पाण्याचे सेवन करा. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. मासिक पाळीत तुम्हाला हेवी ब्लिडींग होत असेल किंवा कमी ब्लिडींग होत असेल तर मेथीचे पाणी पिऊ शकता. ज्यामुळे ब्लड फ्लो वाढतो आणि पिरीएड्सदरम्यान जाणवणाऱ्या वेदना कमी होतात.

रोज गळून केसांचं शेपूट झालंय? सकाळी हा प्रोटीनयुक्त १ लाडू खा, शिकेकाई न लावता दाट होतील के

याशिवाय वजन कमी होण्यासही मदत होते. बेली फॅट कमी  करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही मेथीचा चहासुद्धा घेऊ शकता. एक कप पाण्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे उकळवून घ्या. जेव्हा पाणी अर्ध राहील तेव्हा चहा गाळून सेवन करा. पोटाशी संबंधित समस्या असल्यास तुम्ही रिकाम्या पोटी मेथीची पावडर कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. 

Web Title: How To Reduce Belly Fat Using Fenugreek : Fenugreek Benefits To Lose Fat And Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.