स्त्री असो किंवा पुरुष असो बऱ्याच जणांच्या बाबतीत असं दिसून येतं की वयाची साधारण तिशी- पस्तिशी ओलांडली की मग पोटाचा घेर सुटत जातो. पोट, कंबर, ओटीपोटाचा भाग खूप जास्त वाढतो. काही जणांच्या बाबतीत तर असंही होतं की हात- पाय सुडौल असतात पण पोट मात्र वाढत जातं (simple tips to reduce belly fat). आता पोटाचा हा घेर जर कमीतकमी मेहनतीत तुम्हाला कमी करायचा असेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा...(how to reduce belly fat?)
पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपाय
सुटलेलं पोट कमी करायचं असेल तर त्यासाठी नेमके काय उपाय करायला हवेत याविषयीची माहिती डॉक्टरांनी getfitwith_drchetana या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ज्या काही साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या प्रत्येकाला जमणं सहजशक्य आहे.
वजन पटापट कमी करायचं असेल तर नाश्त्याला हा भरपूर प्रोटीन देणारे ५ पदार्थ, ३० दिवसात पाहा फरक
१. डॉक्टरांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे नाश्ता सकाळी ९ वाजेच्या आधीच करा. त्या नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त असायला हवे. सहसा आपण नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खातो. ते टाळून डाळी, कडधान्ये जास्ती प्रमाणात असणारे पदार्थ खा.
२. रात्रीचं जेवण संध्याकाळी ७ वाजेच्या आधीच करा. याशिवाय रात्रीच्या जेवणात हलके पदार्थ खा. खूप हेवी पदार्थ रात्रीच्या जेवणात घेऊ नका. तेलकट, मसालेदार खाणं टाळा. कारण हलका आहार घेतला तर पचन, मेटाबाॅलिझम चांगलं होतं आणि अंगावर चरबी साचून राहण्याचं प्रमाण कमी होतं.
३. जेवण दुपारचं असो किंवा रात्रीचं असो जेवण झाल्यानंतर लगेचच झोपायचं नाही. शिवाय जेवण झाल्यानंतर बराच वेळ बसूनही राहायचं नाही. जेवण आणि झोप यांच्यामध्ये २ तासांचा गॅस तरी असायलाच हवा. आणि जेवण झाल्यानंतर शतपावली करायलाच हवी. यामुळे अन्नपचन होण्यास मदत होते.
मुलांना 'या' पद्धतीने शिस्त लावाल तर उलटाच परिणाम होईल, मुलं तुमचं ऐकण्याऐवजी उर्मट, उद्धट होतील
४. दोन पायांवर म्हणजेच उकड बसून जास्तीतजास्त कामं करण्याचा प्रयत्न करा. ते शक्य नसेल तर मलासनामध्ये काही वेळ बसा.
५. मैदायुक्त पदार्थ, साखर, बेकरीचे पदार्थ, प्रोसेस्डफूड, जंकफूड पुर्णपणे टाळा. अशा काही साध्या सोप्या गोष्टी करून पाहिल्या तर नक्कीच पोटाचा घेर कमी होण्यास खूप मदत होईल.
