Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन वाढेल म्हणून आवडत असूनही पावभाजी खाणं टाळता? ४ टिप्स- वजन मुळीच वाढणार नाही

वजन वाढेल म्हणून आवडत असूनही पावभाजी खाणं टाळता? ४ टिप्स- वजन मुळीच वाढणार नाही

How To Make Pav Bhaji As A Weight Loss Diet: पाेटभर पावभाजी खाऊनही वजन मुळीच वाढू द्यायचं नसेल तर..(4 tips for making pavbhaji more healthy)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2025 13:37 IST2025-02-04T13:37:16+5:302025-02-04T13:37:59+5:30

How To Make Pav Bhaji As A Weight Loss Diet: पाेटभर पावभाजी खाऊनही वजन मुळीच वाढू द्यायचं नसेल तर..(4 tips for making pavbhaji more healthy)

how to make pav bhaji as a weight loss diet, 4 tips for making pavbhaji more healthy, 4 tips to enjoy pavbhaji without any guilt for weight gain | वजन वाढेल म्हणून आवडत असूनही पावभाजी खाणं टाळता? ४ टिप्स- वजन मुळीच वाढणार नाही

वजन वाढेल म्हणून आवडत असूनही पावभाजी खाणं टाळता? ४ टिप्स- वजन मुळीच वाढणार नाही

Highlightsखाताना आपण खातो पण नंतर मात्र पुन्हा वजन वाढेल म्हणून गिल्टी वाटायला लागतं. पावभाजी खाताना तुमच्याही मनाची अशीच घालमेल होत असेल तर..

पावभाजी हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. पावभाजीचा सुगंध जरी आजुबाजुला दरवळू लागला तरी पोटातली भूक खवळते आणि लगेचच पावभाजीचा आस्वाद घेण्याची प्रबळ इच्छा होती. अशावेळी स्वत:ला कंट्रोल करणं खूप अवघड जातं. पण तरीही असे काही लोक असतात जे फक्त वजन वाढेल या भीतीने पावभाजी खाणं टाळतात. पण कधीतरी स्वत:वरचा ताबा सुटतोच आणि मग पावभाजीवर यथेच्छ ताव मारला जातो. खाताना आपण खातो पण नंतर मात्र पुन्हा वजन वाढेल म्हणून गिल्टी वाटायला  लागतं. पावभाजी खाताना तुमच्याही मनाची अशीच घालमेल होत असेल तर या काही टिप्स लक्षात ठेवा (how to make pav bhaji as a weight loss diet?). पुढे सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही पावभाजी खाल्ली तर वजन मुळीच वाढणार नाही..(4 tips for making pavbhaji more healthy)

पावभाजी खाऊनही वजन वाढू द्यायचं नसेल तर..

 

१. बाहेरची पावभाजी खाणं टाळा

आपण एखाद्या गाडीवर किंवा हॉटेलमध्ये जी पावभाजी खातो त्यामध्ये खूप जास्त बटर, तेल वापरलेलं असतं. शिवाय वेगवेगळे केमिकल्स आणि मसालेही खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शक्यतो विकतची पावभाजी खाणं टाळा. घरी तयार केलेली पावभाजी खाणं सगळ्यात जास्त चांगलं.

आपल्याच अंगणातली तुळस का बहरत नाही? नेहमी का सुकते? ३ गोष्टी तपासा- तुळस वाढेल जोमानं 

२. ऑलिव्ह ऑईल

पावभाजी तयार करण्यासाठी बटरचा खूप वापर करण्यात येतो. पण त्यामुळे खूप जास्त कॅलरी पोटात जातात आणि वजन वाढण्याची भीती असते. त्यामुळे पावभाजी करताना त्यात बटर घालण्यापेक्षा ऑलिव्ह ऑईल घाला. पावभाजी आधिक हेल्दी होईल.

 

३. भाज्यांची निवड

पावभाजीमधील बटाट्याचे प्रमाण कमी करा आणि त्याऐवजी भोपळा, सिमला मिरची, गाजर अशा भाज्यांचे प्रमाण वाढवा. यामुळे भाजीतल्या कॅलरी आणखी कमी होतील.

Ratha Saptami 2025: करिना कपूर, शिल्पा शेट्टीसारख्या सेलिब्रिटींचं फिटनेस सिक्रेट आहे सुर्यनमस्कार, वाचा ५ फायदे

४. पाव खाणं टाळा

पाव नसतील तर पावभाजी खाण्याची काय मजा हे अगदी खरं आहे. पण पुर्णपणे मैद्यापासून तयार केलेले पाव खाणं टाळा. त्याऐवजी गव्हापासून तयार केलेले पाव किंवा मल्टीग्रेन पाव खाण्यास प्राधान्य द्या.

 

Web Title: how to make pav bhaji as a weight loss diet, 4 tips for making pavbhaji more healthy, 4 tips to enjoy pavbhaji without any guilt for weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.