Join us  

पोट मांड्या सुटल्या-फिगर जाड दिसते? रोज लो कॅलरी ५ पदार्थ खा, झरझर वजन कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 9:09 AM

How to Lose Weight Faster : उन्हाळ्याच्या दिवसातं काही लो कॅलरी फूड्सचा आहारात समावेश  करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

खाणंपिणं चांगलं असेल तर याचा थेट परिणाम तब्येतीवरही होतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात डाएटची विशेष काळजी घेणंही तितकंच महत्वाचे असते. (Health Tips) अनेकजण खााण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत ज्यामुळे त्यांचे पोट पुढे येतं. उन्हाळ्याच्या दिवसातं काही लो कॅलरी फूड्सचा आहारात समावेश  करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ज्यामुळे फॅट्स बर्न होण्यास मदत होते आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. (Low Calorie Foods For Summer To Lose Weight Faster)

१) कलिंगड

हाय वॉटर कंटेट कलिंगड ऊन्हाळ्याच्या दिवसांत डाएटचा एक भाग असते. १०० ग्राम टरबूजातून शरीराला  ३० कॅलरीज मिळतात. यात व्हिटामीन ए, व्हिटामीन सी बरोबरच एंटी ऑक्सिडेंट्सस असतातत ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

डोसा तव्याला चिकटतो, जाळी येत नाही? पिठात 'हा' पदार्थ मिसळा-मऊ, जाळीदार बनेल डोसा

२) काकडी

काकडी एक लो कॅलरी फूड आहे. काकडी खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता उद्भवत नाहीत.  काकडी वेट लॉस डाएटचा एक भाग बनवू सकता.  काकडी खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यासही मदत होते शरीर डिटॉक्स होते शरीरात जमा झालेले  टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.

दात पिवळट-हिरड्या काळ्या झाल्या? 'या' घरगुती पावडरनं दात घासा-मोत्यासारखे चमकतील दात

३) ब्रोकोली

ब्रोकोली सगळ्यात हेल्दी असते. ब्रोकोली खाल्ल्याने व्हिटामीन आणि खनिज मोठ्या प्रमाणात असतात. एक कप कापलेल्या ब्रोकोलीमध्ये जवळपास ५५ कॅलरीज असतात.   ब्रोकोली फायबर्सचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं फूड इंटेक कमी होतो. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात समावेश करा.

४) पालक

पालक एक कमीत कमी कॅलरीज  असलेला पदार्थ आहे. पालक एक हिरवीगार भाजी आहे. एक कप कच्च्या पालकात ७ कॅलरीज असतात. पालकात व्हिटामीन ए, सी आणि के, आयर्न असते. कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे शरीर निरोगी राहते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स