lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > डोसा तव्याला चिकटतो, जाळी येत नाही? पिठात 'हा' पदार्थ मिसळा-मऊ, जाळीदार बनेल डोसा

डोसा तव्याला चिकटतो, जाळी येत नाही? पिठात 'हा' पदार्थ मिसळा-मऊ, जाळीदार बनेल डोसा

Cooking Hacks & Tips : हॉटेलसारखा परफेक्ट कुरकुरीत डोसा घरी बनवणं सर्वांनाच शक्य नसते असं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 01:36 PM2024-04-25T13:36:25+5:302024-04-25T13:45:23+5:30

Cooking Hacks & Tips : हॉटेलसारखा परफेक्ट कुरकुरीत डोसा घरी बनवणं सर्वांनाच शक्य नसते असं नाही.

Cooking Hacks & Tips : How to Make Perfect Dosa Batter Dosa Making Tips | डोसा तव्याला चिकटतो, जाळी येत नाही? पिठात 'हा' पदार्थ मिसळा-मऊ, जाळीदार बनेल डोसा

डोसा तव्याला चिकटतो, जाळी येत नाही? पिठात 'हा' पदार्थ मिसळा-मऊ, जाळीदार बनेल डोसा

डोसा सर्वांचाच आवडता नाश्ता आहे. डोसा खाण्यासाठी लोक खास हॉटेलमध्ये जातात आणि सांबार, खोबऱ्याच्या चटणीसोबत याचा आस्वाद घेतात. (Cooking Hacks) हॉटेलसारखा परफेक्ट कुरकुरीत डोसा घरी बनवणं सर्वांनाच शक्य नसते असं नाही. काहीवेळा डोसा तव्याला चिकटतो तर कधी पीठ जास्त पातळ  होते. मार्केटसारखा क्रिस्पी, जाळीदार आणि मऊ डोसा बनवण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. (Kitchen Tips)

1) डाळ आणि तांदूळाचे प्रमाण

अनेक वेळा डाळी आणि तांदळाच्या चुकीच्या प्रमाणामुळे डोसा योग्य प्रकारे तयार होत नाही. त्यामुळे त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्यावी. परिपूर्ण डोसा बनवण्यासाठी तीन भाग तांदूळ आणि एक भाग उडीद डाळीची गरज आहे. तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ वापरा. जर तुम्हाला त्यांचे प्रमाण वाढवायचे असेल तर त्याच प्रमाणात वाढवा.

2) डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजवा

डाळ आणि तांदूळ दोन्ही वेगवेगळे भिजवा. रात्रभर भिजवल्यानंतर ते वेगवेगळे बारीक करून घ्या. यानंतर, दोन्ही एकत्र करा आणि आंबायला ठेवा.

दात पिवळट-हिरड्या काळ्या झाल्या? 'या' घरगुती पावडरनं दात घासा-मोत्यासारखे चमकतील दात

3) फर्मेंटेशनसाठी मोठ्या भांडयाचा वापर

पीठ आंबवण्यासाठी एक मोठे भांडं ठेवावे. सहसा उन्हाळ्यात, आंबवण्यासाठी 7 ते 8 तासं लागतात, तर हिवाळ्यात 10 ते 15 तास लागू शकतात. हवामानानुसार आंबायला पुरेसा वेळ द्या, जेणेकरून डोसा व्यवस्थित बनवता येईल.

4) बॅटरची कंसिस्टंसी

डोश्यासाठी तयार केलेल्या बॅटरच्या कंसिस्टंसीची देखील विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. हे पिठ सामान्य रूम तापमानात ठेवावे आणि व्यवस्थित आंबू द्यावे.

ऊन्हात जायला नको-व्हिटामीन D कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना येईल भरपूर ताकद

5) फर्मेंटेशनदरम्यान फ्रिजमध्ये ठेवू नका

फर्मेंट करताना पीठ फ्रिजमध्ये ठेवू नका, यामुळे किण्वन प्रक्रिया थांबते. जर तुम्ही पीठ आंबवल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवले असेल तर ते बनवण्यापूर्वी सुमारे दोन तास आधी बाहेर काढा, जेणेकरून ते सामान्य होईल.

डोसा करण्याची योग्य पद्धत

१) डोसा बनवण्यासाठी प्रथम पॅन चांगला गरम होऊ द्या. यानंतर, तेल लावा आणि थोडे पाणी घाला आणि पॅन कापडाने स्वच्छ करा, जेणेकरून पॅन गुळगुळीत आणि स्वच्छ होईल. यानंतर तव्यावर थोडं तेल लावा आणि नंतर त्या भांड्यात थोडं पीठ टाका आणि हलक्या हाताने फिरवून गोल बनवा.

२) कढईवर पीठ टाकल्यावर आच मंद ठेवा. यानंतर, बाजूंनी थोडे तेल घालून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. यानंतर मधोमध बटाटे किंवा चिझचे स्टफिंग भरून ते भरून सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Cooking Hacks & Tips : How to Make Perfect Dosa Batter Dosa Making Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.