Join us

कोण सांगतं रात्री वरण-भात खाऊन पोट सुटतं? या पद्धतीनं वरण-भात खा, १ इंचही पोट सुटणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:50 IST

How To Eat Dal Rice or Weight Loss :

भारतीय घरांमध्ये वरण-भात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. वरण-भात रोजच्या आहाराचा एक भाग आहे. अनेकजणांचा असा समज असतो की वरण भात जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढतं किंवा पोट सुटतं. म्हणून लोक आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतात ( Weight Loss Tips How To Eat Dal Chawal In Right Way). न्युट्रिशनिस्ट शंभवी यांनी आहार कसा असायला हवा याबाबत इंस्ट्राग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शंभवी वजन कमी करण्यासाठी डाळ-भात कसा खावा याबाबत सांगत आहेत. ( Weight Loss Tips How To Eat Dal Chawal In Right Way)

आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डाळ-भात खाताना लोक पूर्ण प्लेट भरून खातात. पण वजन कमी करण्याासाठी डाळ आणि भात खाण्याची योग्य पद्धत माहीत असावी लागते. वजन कमी करण्याासाठी ताटात फक्त वरण भातच नाही तर इतर पदार्थांचाही समावेश करायला हवा. कारण वरण-भात या दोन्हीतून शरीराला कार्ब्स मिळतात ज्यामुळे शुगर लेव्हल वेगानं वाढू लागतं. (How To Eat Dal Chawal For Weight Loss)

डाळ, भातासोबत कोणत्याही भाजीचा तुम्ही आहारात समावेश केला तर जेवण अधिक हेल्दी होईल. आहारात प्रोटीन्सचा समावेश करा. प्रोटीनसाठी पनीर किवा टोफू प्लेटमध्ये ठेवू शकता. या प्लेटच्या तिसऱ्या भागात डाळ-भाताचा समावेश करा. न्युट्रिशनिस्ट सांगतात की असं केल्यानं वजन वेगानं कमी होण्यास मदत होते.

या टिप्सचा वापरा

वजन कमी करण्याासठी तुम्ही काही खास टिप्सचा वापर करू शकता. त्यासाठी रोज सकाळी उठून डिटॉक्स वॉटर किंवा चिया सिड्सचे पाणी प्या ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. खाल्ल्याच्या अर्धा तासानंतर गरम पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील एक्सेस फॅट कमी होते. तुम्ही जे काही खात आहात त्याचे टेंशन न घेता आनंद घेऊन खा.

चेहरा टॅन झालाय? १० रूपयांच्या तुरटी रात्री 'या' पद्धतीनं लावा; सकाळी तेज येईल-सुंदर दिसाल

टेंशन घेतल्यानं वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं. शरीर एक्टिव्ह ठेवा. जेवल्यानंतर अर्धा तास वॉक करा. दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला वॉक करायचं नसेल तर रात्रीच्या जेवणानंतर वॉक करू शकता. ताटात किती अन्न वाढलं आहे याकडे लक्ष द्या. ताट पूर्ण न भरता योग्य प्रमाणातच अन्न घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat dal-rice right for weight loss; no belly fat!

Web Summary : Dal-rice is a staple, but excess can cause weight gain. Nutritionist Shambhavi suggests balancing carbs by adding vegetables and protein like paneer or tofu. Portion control and mindful eating, along with morning detox drinks and post-meal walks, aid weight loss.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.वेट लॉस टिप्स