सुकामेवा आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर असतो. पण तो जर योग्य पद्धतीने खाल्ला तरच त्याचा शरीराला लाभ होतो. त्यात असणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा पुरेपूर लाभ शरीराला होतो. बदाम, अक्रोड, मनुका असे पदार्थ रोजच खावे, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. हिवाळ्यात तर हे पदार्थ खाणं विशेष पौष्टिक मानलं जातं. म्हणूनच तर या दिवसांत सुकामेव्याचे लाडूही केले जातात. आता तुम्हाला लाडू न करता सुकामेवा नुसता खायचा असेल तर त्यापैकी अक्रोड हे कोणत्या पद्धतीने खायला हवे जेणेकरून ते अधिक आरोग्यदायी ठरू शकतात ते पाहूया..(how to eat akrod or walnut in winter?)
हिवाळ्यात अक्रोड खाण्याची योग्य पद्धत कोणती?
अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड, एंटीऑक्सीडंट्स, व्हिटॅमिन ई आणि बी ६, फोलेट, मॅग्नेशियम, प्रोटीन्स, फायबर भरपूर प्रमाणात असतात. एका प्रौढ व्यक्तीने दिवसातून २ ते ३ अक्रोड खाणं योग्य आहे. ते कशा पद्धतीने खायला हवे ते पाहूया..
फक्त १५ दिवस चेहऱ्याला 'हा' लेप लावा, त्वचेवर नवं तेज येऊन चेहरा चमकेल, रूप खुलेल
१. रोज रात्री झोपण्यापुर्वी एका वाटीमध्ये २ ते ३ अक्रोड घ्या. ते स्वच्छ धुवा आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये भिजत घाला. दुसऱ्यादिवशी सकाळी रात्रभर पाण्यात भिजलेले अक्रोड उपाशीपोटी खा. असे केल्याने अक्रोड तर स्वच्छ होतातच, पण ते पचायला अधिक हलके होतात. शिवाय त्यातील ॲण्टीऑक्सिडंट्स वाढतात.
२. अक्रोडचे दूध पिणेही या दिवसांत फायदेशीर ठरते. यासाठी ३ ते ४ अक्रोड ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या.
हिवाळ्यात सांधे कुरकुरू लागले? गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? घ्या सोपा उपाय- दुखणं थांबेल
दिड कप दुधामध्ये अक्रोडची पेस्ट टाका आणि हे दूध उकळवून घ्या. त्यामध्ये वेलचीपूड, केशर आणि मध घालून प्या. शरीर उबदार राहण्यास मदत होते.
३. अक्रोडची पावडर तयार करा आणि ती वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घालून खा. यामुळेही अक्रोड खाण्याचे पुरेपूर फायदे शरीराला मिळतात.
