Belly Fat : मेथीच्या दाण्यांचा वापर भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये रोज केला जातो. या बियांनी टेस्ट तर वाढतेच सोबतच आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. जे लोकांना माहीत नसतात. मेथीच्या बियांच्या माध्यमांतून आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. ज्या लोकांना रात्री संडास येण्याची समस्या होत असेल त्यांच्यासाठी ही मेथी फारच फायदेशीर ठरते. तसेच मेथीच्या बीयांचं सेवन करून तुम्ही झोप न येण्याची आणि पोटदुखीची समस्याही दूर करू शकता.
पोटावरील चरबी होईल कमी
बरेच लोक वाढलेल्या पोटामुळे चिंतेत असतात. पोटावरील चरबीमुळे शरीर बेढब तर दिसतंच, सोबतच आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात. अशात तुम्ही मेथीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून पिऊ शकता. मेथी आणि लिंबाच्या पाण्यानं शरीर हायड्रेटेड राहतं. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि यामुळे पचनासंबंधी समस्या दूर होतात. मेथीच्या बियांमध्ये फायबर भरपूर असतं, तसेच व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर मिळतं. यानं शरीरात वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते. सोबतच शरीरात जमा झालेले टॉक्सिन्सही बाहेर पडतात.
कसं बनवाल?
मेथी आणि लिंबाचं वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी एक चमचा मेथीच्या बिया एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गरम करून एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस टाका. हवं तर तुम्ही मेथीच्या बिया फेकण्याऐवजी चावून खाऊ शकता.
मेथीच्या बियांचे फायदे
पोट होईल साफ
बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे जी सामान्य वाटत असली तरी ज्या व्यक्तीला याचा त्रास होतो त्याचा जीव अगती मेटाकुटीस आलेला असतो. जर या त्रासापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल त्यांच्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे लगेच आराम मिळेल.
पोट साफ करण्यासाठी कसं प्याल पाणी?
बद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथी 2 ग्लास पाण्यात टाकून पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत पाणी उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट याचं सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल.
मेथीच्या बियांचे इतर फायदे
मेथीच्या बियांच्या पाण्यानं पचनक्रियाही चांगली होईल. इतकेच नाही तर पोटाशी संबंधित अनेक समस्याही याने दूर होतात. अनेकांना झोप न येण्याची समस्या असते. अशांसाठीही मेथी फायदेशीर ठरते. मेथीच्या पाण्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते.
कोलेस्टेरॉल होईल कमी
मेथीच्या बियांचं पाणी प्यायल्यास कोलेस्टेरॉल लेव्हलही संतुलित करण्यास, किडनीसंबंधी समस्या दूर करण्यास, डायबिटीसची समस्या दूर करण्यास, हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास आणि केसांची काळजी घेण्यासाठी फायदा होतो.
फुप्फुसाची समस्या होते दूर
महत्वाची बाब म्हणजे मेथीच्या बियांच्या पाण्यानं फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावं.