Join us

जिभेवर ताबाच नसल्याने सारखं गोड खाता? ५ टिप्स- शुगर क्रेव्हिंग कमी होऊन वजन राहील कंट्रोलमध्ये..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 17:27 IST

How To Control Sugar Craving?: गोड पदार्थ खाणं अनेकांना कंट्रोल होत नाही. त्यामुळे मग वजन वाढत जातं. असं तुमचंही होत असेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवाच...(5 tips to control sugar cravings and helps for fast weight loss)

ठळक मुद्देज्या लोकांना भरपूर वेळ असतो त्यांना उगाच येता- जाता काही तरी तोंडात टाकण्याची सवय असते.

वजन वाढण्याची जी काही प्रमुख कारणं आहेत त्यापैकीच एक आहे गोड खाण्याची सवय. गोडधोड पदार्थ खाल्ले की चटकन वजन वाढतं. त्यामुळेच तर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी सगळ्यात आधी गोड पदार्थ खाणं कमी केलं पाहिजे असं डॉक्टर नेहमीच सांगतात. पण काही जणांना मात्र गोड खाण्याची एवढी जबरदस्त इच्छा होते की ते गोड खाणं कंट्रोल करूच शकत नाहीत. अगदी रोजच्या रोज त्यांना काहीतरी गोड हवं असतं. शिवाय त्यांचं खाणंही कंट्रोलमध्ये नसतं. थोडंसं खाऊन समाधान होत नाही. त्यामुळे मग ते खूप जास्त गोड खातात आणि मग वजनही तेवढ्याच वेगात वाढत जातं (How To Control Sugar Craving?). असं तुमचंही होत असेल तर गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी या काही गोष्टी करून पाहा.(5 tips to control sugar cravings and helps for fast weight loss)

 

गोड खाण्याची सवय कशी कमी करावी?

शुगर क्रेव्हिंग कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ हरीलक्ष्मी यांनी हेल्थशॉटला दिली आहे. 

पोळ्या- फुलके खाण्याचा कंटाळा आला? ५ मिनिटांत करा अचारी पराठा- कुणाल कपूर स्पेशल चटपटीत रेसिपी

१. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. जर तुम्ही पुरेसं पाणी पिऊन शरीर व्यवस्थित हायड्रेटेड ठेवलं तर आपोआपच पोट भरल्यासारखं वाटतं. भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि मग गोड खाण्याची इच्छा होत नाही.

२. आहारातले प्रोटीन्सचे प्रमाण वाढवा. जर शरीरात प्रोटीन्स योग्य प्रमाणात असतील तर त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच ॲपेटाईट हार्मोन योग्य प्रमाणात स्त्रवू लागतो. या हार्मोनमुळे जास्त भूक लागून खा- खा होत नाही.

 

३. आहारात फायबरयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात असल्यानेही शुगर क्रेव्हिंग बऱ्याच प्रमाणात कमी होते.

४. जेव्हा तुम्ही गोड पदार्थ खाता तेव्हा ते खूप स्पीडमध्ये खाऊ नका. कारण खूप स्पीडमध्ये खाल्ल्याने तुम्ही भुकेपेक्षा जास्त खाता तरी मेंदू तुम्हाला सिग्नल देत नाही. त्याउलट सावकाश खाल्ल्याने लगेच मेंदूकडून संदेश येतो आणि पोट भरल्यासारखं वाटतं.

वजन कमी करायचंय? ६-६-६ पद्धतीने करा वॉकिंग! बघा वेटलॉसची एकदम ट्रेडिंग पद्धत

५. तुम्ही जेवढं कामात गुंतून राहाल तेवढी तुमची खा- खा कमी होते. ज्या लोकांना भरपूर वेळ असतो त्यांना उगाच येता- जाता काही तरी तोंडात टाकण्याची सवय असते. त्यामुळेही त्यांचं साखर खाण्याचं आणि गरजेपेक्षा जास्त खाण्याचं प्रमाण वाढतं. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स