टिव्ही सिरियल्समधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आपलं सौंदर्य आणि फिटनेस यामुळे कायम चर्चेत असते. श्वेताचं वय ४४ वर्ष असून तिला २४ वर्षांची लेक आहे. तिचं नाव पलक तिवारी आहे आणि एक मुलगासुद्धा आहे. या वयातही इतकं फिट पाहून अनेकांना प्रश्न पडतो की श्वेता इतकी फिट राहते कशी, याबाबत एका पॉडकास्टमध्ये तिनं खुलासा केला आहे. भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये तिनं आपलं फिटनेस रूटिन शेअर केला आहे. या पॉडकास्टमध्ये तिनं फिटनेस सिक्रेट्सबाबत सांगितले. (How Shweta Tiwari looks like a 20-year-old What Is her fitness secret)
आपल्या एका मुलाखतीत श्वेता तिवारीनं सांगितलं की स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती पिलेट्स, वॉकिंग आणि वेट ट्रेनिंग करते. नियमित हे व्यायाम केल्यानं तब्येतीत चांगला परिणाम दिसून येतो वाढत्या वयात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तुम्ही काही सोपे व्यायाम करू शकता.
श्वेतानं आपल्या डाएटबद्दल फार माहिती सांगितली नाही. तिच्या म्हणण्यानुसार ती नेहमी घरच्या जेवणाला प्राधान्य देते. खाण्यापिण्याबाबत कायमच खूपच सजग असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार श्वेता तिवारीचे डाएट खूपच सिंपल आणि बॅलेंस्ड आहे. ती नेहमी घरचं अन्न खाते. दिवसाची सुरूवात लिंबू पाण्यानं करते. नंतर नाश्त्याला ओट्स किंवा अंडी खाते. दुपारच्या जेवणात चपाती, भाजी आणि प्रोटीनयुक्त डाळ, भात, सॅलेड या पदार्थांचा समावेश करते. तर रात्रीच्या जेवणात सूप किंवा ग्रिल्ड भाज्यांचा समावेश करते.
या पद्धतीनं बॅलेस्ड डाएट घेऊन तुम्हीही वजन कमी करू शकता. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर या पद्धतीनं डाएट करू शकता. प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगवेगळा असतो. योग्य डाएट प्लन घेऊन तुम्ही चांगल्या डायटिशियनशी संपर्क साधून तब्येतीची काळजी घेऊ शकता.
जर तुम्हाला जीमला जायला जास्त वेळ नसेल तर डेली रूटीनमध्ये काही हेल्दी सवयींचा समावेश करू शकता. फिजिकली एक्टिव्ह राहा, लिफ्ट ऐवजी शिड्यांचा वापर करा. घरातली लहान मुलांसोबत खेळा, भरपूर झोप घ्या. जेणेकरून तुम्ही फिट-एक्टिव्ह राहाल.
