Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उंचीनुसार किती असायला हवं तुमचं वजन? हातपाय बारीक पण आहात लठ्ठ, असं तर नाही..

उंचीनुसार किती असायला हवं तुमचं वजन? हातपाय बारीक पण आहात लठ्ठ, असं तर नाही..

Weight According To Height: उंचीनुसार वजन बरोबर असेल तर तुम्ही हेल्दी आहात. अशात उंचीनुसार तुमचं वजन किती असायला हवं हे जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:55 IST2025-01-31T10:38:53+5:302025-02-01T16:55:05+5:30

Weight According To Height: उंचीनुसार वजन बरोबर असेल तर तुम्ही हेल्दी आहात. अशात उंचीनुसार तुमचं वजन किती असायला हवं हे जाणून घेऊ.

How much should your weight according to your height? | उंचीनुसार किती असायला हवं तुमचं वजन? हातपाय बारीक पण आहात लठ्ठ, असं तर नाही..

उंचीनुसार किती असायला हवं तुमचं वजन? हातपाय बारीक पण आहात लठ्ठ, असं तर नाही..

Weight According To Height: सामान्यपणे ज्या लोकांचं वजन जास्त असतं त्यांना लठ्ठ समजलं जातं आणि जे बारीक असतात त्यांना कमजोर मानलं जातं. मात्र, एक्सपर्टनुसार तुमचं वजन तुमच्या उंचीनुसार असायला हवं. जर उंचीनुसार तुमचं वजन कमी असेल तर तुम्ही अनहेल्दी असाल. तेच उंचीनुसार वजन बरोबर असेल तर तुम्ही हेल्दी आहात. अशात उंचीनुसार तुमचं वजन किती असायला हवं हे जाणून घेऊ.

उंचीनुसार किती असावं वजन?

एक्सपर्टनुसार, जर तुमची उंची ४ फूट १० इंच असेल तर तुमचं वजन ४१ किलो ते ५२ किलो दरम्यान असायला हवं. ही एक वजनाचं एक हेल्दी प्रमाण आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त वजन असेल तर तुम्ही अनहेल्दी असाल.

ज्या लोकांची उंची ५ फूट आहे त्यांचं वजन ४४ किलो ते ५५.७ किलो दरम्यान असायला हवं. त्यांना ओव्हर वेट मानलं जाणार नाही. जर ४४ किलोपेक्षा कमी किंवा ५५ किलोपेक्षा जास्त वजन असेल तर तुम्ही अंडरवेट किंवा ओव्हर वेट व्हाल.

ज्या लोकांची उंची ५ फूट २ इंच असेल त्यांचं वजन ४९ किलो ते ५३ किलो दरम्यान असायला हवं. ५३ किलोपेक्षा जास्त वजन असेल तर तुम्ही ओव्हर वेट कॅटेगरीमध्ये याल. तेव्हा तुम्हाला वर्कआउट करून वजन कमी करावं लागू शकतं.

ज्यांची उंची ५ फूट ४ इंच असते, अशा लोकांचं वजन ४९ किलो ते ५३ किलो दरम्यान असायला हवं.

५ फूट ६ इंच उंची असलेल्या लोकांचं वजन ५३ किलो ते ६७ किलो दरम्यान असायला हवं.

ज्यांची उंची ५ फूट ८ इंच असेल, त्यांचं वजन ५६ ते ७१ किलो दरम्यान असायला हवं.
ज्या लोकांची उंची ५ फूट १० इंच असते, अशा लोकांचं वजन ५९ किलो ते ७१ किलो दरम्यान योग्य असतं. इतकी उंची सामान्यपणे पुरूषांची असते.

६ फूट उंची सामान्यपणे पुरूषांची असते आणि अशा लोकांचं वजन ६३ किलो ते ८० किलो दरम्यान असायला हवं. 

हेल्दी वेट मेंटेन ठेवण्यासाठी काय करावं?

हेल्दी वेट मेंटेन ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं फार गरजेचं असतं. यात आवश्यक पोषक तत्व जसे की, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि हेल्दी फॅटचा समावेश असावा.
त्याशिवाय जेवढी भूक लागते त्यापेक्षा थोडं कमी खावं. गोड, तळलेले, भाजलेले पदार्थ खाणं टाळावं. दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यावं. पाण्यानं शरीर डिटॉक्स होतं आणि मेटाबॉलिज्म वाढतं. प्रमाणापेक्षा जास्त कॅलरी घेऊ नका. रात्री साधारण ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. तणाव वाढला तर ओव्हरईटिंग होऊ शकतं, ज्यामुळे वजन वाढतं. अशात तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा.

Web Title: How much should your weight according to your height?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.