नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच अनेकजण वजन कमी करण्याचा विचार करत असतील. जीम मेंबरशीप, डाएट, योगा, व्यायाम करण्याचा प्लान देखील आखला असेल. वजन कमी करायचं म्हटलं की अनेक जण थेट जिम, डाएट प्लान किंवा महागडे सप्लिमेंट्स घेतात.(walking for weight loss) पण तज्ज्ञ सांगतात वजन कमी करण्याचा सगळ्यात साधा सोपा उपाय म्हणजे चालणे. काही जण सकाळी व्यायाम करतात तर काही जण संध्याकाळी.(morning walk vs evening walk) पण अनेकदा वजन कमी करण्यासाठी चालणं पुरेसं नसतं. आपण दिवसभरात किती पावलं चालायला हवे, केव्हा चालायचं. हे देखील तितकचं महत्त्वाचं आहे. कारण वेळ चुकली तर केलेली मेहनत अपेक्षित परिणाम देत नाही. (steps for weight loss)
फॅन्सी डाएटचं वेड सोडा! खा हाय प्रोटीन सोया फ्राइड राईस, चमचमीत पौष्टिक भाताची सोपी रेसिपी
आजकाल १० हजार पावले चालणे हा फक्त आकडा आहे. पण प्रत्येक व्यक्तीसाठी सारखाच नियम लागू होईल असं नाही. वजन, वय, दिनचर्या आणि आरोग्य यावर चालण्याच्या पावलांची संख्या ठरते. वजन कमी करण्यासाठी दिवसाला किमान ६ ते ८ हजार पावले चालणं फायदेशीर मानलं जातं. यापेक्षा कमी चालल्यास शरीरात कॅलरी बर्न होण्याचा वेग देखील मंदावतो. तर अचानकपणे खूप जास्त चालल्यास थकवा आणि सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. पण अनेकदा प्रश्न पडतो सकाळी चालणं फायदेशीर की संध्याकाळी?
दिवसभर आपण कामात व्यस्त असतो. ज्यामुळे आपल्याला व्यायाम, योगा करता येत नाही. सतत एकाच जागी बसल्याने वजन भरभर वाढते. तसेच बाहेरचे जंक फूड देखील आपण अतिप्रमाणात खातो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आणि लठ्ठपणा वाढतो. सकाळी रिकाम्या पोटी चालल्याने शरीर थेट साठवलेल्या फॅटचा वापर ऊर्जेसाठी करतं, असं मानलं जातं. त्यामुळे फॅट बर्न वेगाने होतो. तसेच सकाळी ताजी हवा, शांत वातावरण आणि सूर्यप्रकाश यामुळे मन प्रसन्न राहतं. पचन सुधारत आणि दिवसभर आपण ऊर्जात्मक राहतो.
संध्याकाळी चालणं थोडं फार कठीण असतं. कारण दिवसभराचा थकवा आणि ताण असतो. ज्यामुळे आपण पुरेशा प्रमाणात व्यायाम किंवा चालत नाही. पण दिवसभराच्या ताणतणावानंतर चालल्याने ताणतणाव कमी होतो, रक्ताभिसरण सुधारतं आणि झोप देखील चांगली लागते. संध्याकाळी जेवणानंतर आपण ३० ते ४५ मिनिटं चालणं वजन नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतं. जर आपल्यालाही वजन कमी करायचे असेल तर नियमितपणे चालायला हवे.
