सध्याच्या धावपळीच्या आणि बैठ्या जीवनशैलीत फिट राहणं हे सर्वात मोठे आव्हान बनलं आहे. तासनतास ऑफिसमध्ये एका जागी बसून राहिल्यामुळे अनेकांचा पोटाचा घेर (Belly Fat) वाढतो, तर चालण्या-फिरण्याच्या अभावामुळे मांड्यांवरची चरबी (Thigh Fat) देखील वाढत चालली आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी महागड्या जिमची मेम्बरशिप घेतात किंवा कडक डाएट करतात, पण कामाच्या व्यापात हे सर्व रोज करणं कठीण होते. अशावेळी, आपल्याकडे असलेला सर्वात सोपा, शून्य खर्चाचा आणि जादुई उपाय म्हणजे चालणे. (Belly fat loss)पण फक्त फेरफटका मारल्याने वजन कमी होत नाही. वजन झरझर घटवण्यासाठी आणि शरीराला सुडौल आकार देण्यासाठी रोज नक्की किती किलोमीटर चालावे? दिवसाला किती पावले चालल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळू शकते? पाहूया, किती पावलं आपण रोज चालायला हवे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते रोज ७००० ते १०,००० पावले चालायला हवे. सात ते दहा हजार पावले म्हणजे अंदाजे पाच ते आठ किलोमीटर अंतर. जर आपल्याला चांगले आरोग्य हवं असेल तर रोज एक तास चालायला हवं. यामुळे महिन्याभरात आपल्याला शरीरात बदल पाहायला मिळतील.
जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर, आजपासून चालायला सुरुवात करा. चालण्याची सवय हृदयाच्या आरोग्यावर देखील सकारात्मक परिणाम करते. हाडे आणि स्नायू मजबूत करायचे असतील तर नियमितपणे चालण्याची दिनचर्या ठेवा. जर आपण दिवसाला ७,००० ते ८,००० पावले 'ब्रिस्क वॉकिंग' पद्धतीने चाललात, तर शरीरातील चरबी जळण्यास सुरुवात होते.
वजन कमी करण्यासाठी साधारणपणे रोज ५ ते ६ किलोमीटर चालणे आवश्यक आहे. पोटाचा घेर कमी करण्यासाठी शरीराला कॅलरी डेफिसिटमध्ये जावे लागते. ५ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरातील सुमारे २५० ते ३०० कॅलरीज खर्च होतात. जर आपण हे सातत्याने ३० दिवस केले, तर आपल्याला आपल्या शरीरात बदल पाहायला मिळेल.
Web Summary : Walking is a simple way to reduce belly and thigh fat. Aim for 7,000-10,000 steps (5-8 km) daily, briskly, to burn calories, improve heart health, and strengthen muscles. Consistency yields noticeable results in a month.
Web Summary : पेट और जांघ की चर्बी कम करने के लिए पैदल चलना एक सरल तरीका है। कैलोरी बर्न करने, हृदय स्वास्थ्य में सुधार करने और मांसपेशियों को मजबूत करने के लिए रोजाना 7,000-10,000 कदम (5-8 किमी) तेज गति से चलें। निरंतरता से एक महीने में ध्यान देने योग्य परिणाम मिलते हैं।