उंची कमी दिसण्याची भीती विसरा! कॉलेज- ऑफिसला जाताना घाला ५ प्रकारचे टॉप्स- दिसाल स्मार्ट आणि स्टायलिश
Updated:February 22, 2026 20:00 IST2026-02-22T20:00:00+5:302026-02-22T20:00:02+5:30
Fashion tips for short height: How to look taller: Styling tips for petite women: उंच दिसण्यासाठी फॅशन टिप्स

आपली उंची कमी असल्यामुळे अनेक मुलींच्या मनात न्यूनगंड तयार होतो. त्यांच्यावर सर्व प्रकारचे कपडे देखील शोभून दिसत नाही. कॉलेज किंवा ऑफिसला जाताना नेमकं काय घालावं असा प्रश्न त्यांना पडतो. चुकीच्या फिटिंगचे किंवा चुकीच्या डिझाईनचे टॉप्स घातल्यामुळे शरीर अधिक बुटके किंवा पसरट दिसू लागते.(Fashion tips for short height)
योग्य 'कट', 'नेकलाईन' आणि 'पॅटर्न' वापरून आपण आपली उंची परफेक्ट भासवू शकतो. कमी उंचीच्या मुलींनी कोणत्या पद्धतीचे कपडे घालायला हवे पाहूया. ( How to look taller)
सध्या क्रॉप-टॉप हा ट्रेंडमध्ये आहे. आपण हे हाय वेस्ट जीन्स किंवा स्कर्टसोबत घालू शकतो. क्रॉप टॉप आपल्या कंबरेला हायलाइट करतात. ज्यामुळे आपली उंची दिसते.
व्ही-नेक टॉप्स छोट्या उंचीच्या मुलींना छान दिसतात. हे घातल्याने मान लांब दिसते. यामुळे आपला पूर्ण लूक छान दिसतो. खूप लूज किंवा लांब व्ही-नेक असलेले टॉप घालू नका.
पेप्लम टॉप आपल्यासाठी छान दिसेल. हेवी वेट असणाऱ्या मुलींसाठी हा टॉप चांगला दिसतो. कमी उंचीच्या मुलींसाठी फिट असलेला पेप्लम टॉप चांगला आहे.
चुकूनही आडव्या रेषा असलेले टॉप्स घेऊ नका, कारण त्यामुळे आपण अधिक बुटके आणि जाड दिसू शकतो. उभ्या रेषा डोळ्यांना एक सलग वर-खाली हालचाल करायला लावतात, ज्यामुळे उंचीचा भास होतो.
जेव्हा आपण डोक्यापासून पायापर्यंत एकाच रंगाचे कपडे घालतो तेव्हा आपली उंची अधिक चांगली दिसते. यात आपण गडद रंगाचे टॉप्स निवडू शकतो.