भारतीय आहारात चपाती (Chapati) हा सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. चपातीत कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला त्वरीत एनर्जी देतात. ज्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहतं. बरेच लोक दुपारच्या जेवणात तर काही लोक रात्रीच्या जेवणात चपाती खाणं पसंत करतात. तर काहीजण नाश्त्याला चहा-चपाती खातात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर चपाती कमी प्रमाणात खायला हवी. गव्हाची चपाती वजन वाढवू शकते. ज्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. आहारततज्ज्ञांकडून समजून घ्यायला हवं की एका दिवसाला किती चपात्या खायला हव्यात आणि कोणते पीठ कार्ब्स कंट्रोल करण्यास मदत करते. (How many chapatis should you eat in your daily meal to lose weight)
वजन कमी करण्यासाठी एका दिवसाला किती चपात्या खाव्यात?
वजन कमी करण्यासाठी एका दिवसाला १८०० ते २००० कॅलरी घ्यायला हव्यात. यात २२५ ते ३२५ कॅलरीज तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही १ मध्यम आकाराची चपाती खाल्ली तर त्यात जवळपास १५ ग्रॅम कार्ब्स आणि ७० ग्रॅम कॅलरीज शरीराला मिळतात. साध्या पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी रोज १५० ग्रॅम कार्ब्स कमी करायला हवेत. महिलांनी एका दिवसाला ३ ते ४ छोट्या चपात्या आणि पुरूषांनी १ दिवसाला ५ ते ६ चपात्यांपेक्षा अधिक खाऊ नये.
वजन कमी करण्यासाठी कोणत्या पिठाची चपाती खायला हवी?
लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या धान्याची चपाती खाता हे खूपच महत्वाचे असते. जर तुम्ही पिठात बदल केला तर वजन कमी करणं सोपं होऊ शकतं. वजन कमी करण्यासाठी गव्हाऐवजी मल्टीग्रेन पिठाच्या चपात्या खा. तुम्ही ज्वारी, नाचणी, बाजरीची भाकरी खाऊ शकता. ज्यामुळे बराचवेळ पोट भरलेलं राहतं आणि वजनही नियंत्रणात राहतं.
वजन कमी करण्यासाठी दुपारी काय खावं?
वजन कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात भाज्या, सॅलेड, लिक्विड्स यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. जसं की दुपारच्या जेवणात १ वाटी डाळ, १ वाटी दही, १ वाटी सॅलेड असावं. दिवसाला ३ लिटर पाणी प्या. पुरेशी झोप घ्या. रोज कमीत कमी अर्धा तास फिटनेस एक्टिव्हीटीज करा.
