Weight Loss Tips: एकदा वाढलेलं वजन कमी करणं काही खायचं काम नसतं. मात्र, नियमित एक्सरसाईज, हेल्दी डाएट आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही वजन कमी करण्याचं लक्ष्य पूर्ण करू शकता. आता तुम्ही म्हणाल की, बरेच लोक रोज एक्सरसाईज करतात, पण तरीही त्यांचं वजन कमी होत नाही. तर केवळ एक्सरसाईज करून किंवा योग्य डाएट घेऊन चालणार नाही. एक्सरसाईजचे काही नियम फॉलो करणंही तेवढंच गरजेचं असतं. म्हणजे वजन कमी करण्यासाठी किती वेळ एक्सरसाईज करावी आणि कोणती एक्सरसाईज जास्त प्रभावी ठरेल हे माहीत असणं फार महत्वाचं आहे. नाही तर तुमच्या मेहनतीला काही अर्थ राहणार नाही.
रोज कितीवेळ एक्सरसाईज?
वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज करण्याची वेळ हे व्यक्तीचं वय, हेल्थ कंडीशन आणि फिटनेस लेव्हलवर अवलंबून असतं. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, एका वयस्क व्यक्तीनं आठवड्यातून कमीत कमी १५० मिनिटं मॉडिरेट इंन्टेसिटी एरोबिक अॅक्टिविटी किंवा ७५ मिनिटं हाय इंन्टेसिटी एक्सरसाईज करावी.
सुरूवात करणाऱ्यांसाठी
जर तुम्ही नियमितपणे एक्सरसाईज करू शकत नसाल तर सुरूवातीला २० ते ३० मिनिटं मीडिअम एक्सरसाईज करावी. हळूहळू ही वेळ ४५ ते ६० मिनिटांपर्यंत नेऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी
जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर रोज ६० ते ९० मिनिटं एक्सरसाईज करू शकता. यात एरोबिक, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाईजचा समावेश आहे. एक्सरसाईजसोबतच हेल्दी डाएट, भरपूर झोप आणि भरपूर पाणी पिणंही गरजेचं आहे.
वजन कमी करण्यासाठी बेस्ट एक्सरसाईज
धावणं
धावणं वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट एक्सरसाईज मानली जाते. धावल्यानं अधिक कॅलरी बर्न होतात. ३० मिनिटांपर्यंत धावल्यानं जवळपास ३०० ते ४०० कॅलरी बर्न होतात. जर तुम्ही नव्या सुरूवात करत असाल तर धावण्याचा स्पीड कमी ठेवा. नंतर हळूहळू स्पीड वाढवा.
सायकल चालवा
सायकलिंग करण्यात मजा तर येतेच, सोबतच संपूर्ण शरीराची एक्सरसाईजही होते. पाय, मांड्या आणि कंबरेचे स्नायू सायकलिंगनं मजबूत होतात आणि भरपूर कॅलरी बर्नही होतात. ३० मिनिटांपर्यंत सायकल चालवल्यास २०० ते ३०० कॅलरी बर्न होतात.
स्वीमिंग
स्वीमिंग एक संपूर्ण एक्सरसाईज आहे. जी वजन कमी करण्यासोबतच स्नायू मजबूत करण्यात करण्यास मदत करते. पाण्यामुळे शरीराचं वजन कमी होतं. ३० मिनिटांपर्यंत स्वीमिंग केल्यास २५० ते ४०० कॅलरी बर्न होतात.
जंपिंग जॅक
जंपिंग जॅक एक सोपी, पण प्रभावी कार्डिओ एक्सरसाईज आहे. जी संपूर्ण शरीराला अॅक्टिव करते. जंपिंग जॅकमुळे हार्ट रेट वाढतो आणि कॅलरी सुद्धा बर्न होतात. १० ते १५ जंपिंग जॅक केल्यास १०० ते १५० कॅलरी बर्न होतात.
पुश-अप्स आणि स्क्वॅट्स
पुश-अप्स आणि स्क्वॅट्स स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाईजपैकी एक आहे. या एक्सरसाईजच्या माध्यमातून स्नायू मजबूत होतात आणि मेटाबॉलिज्म वाढतं. स्नायू मजबूत असतील तर कॅलरी जास्त बर्न होतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.