भात (Rice) हे भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख अन्न आहे. भाताचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केल्यास बरेच फायदे होतात. दक्षिण भारतात तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त आहे. आजकाल बरेचजण फिटनेसकडे लक्ष देत असताना आहारातून भात वगळतात किंवा कमी खातात. अशात दक्षिणेकडील लोक नेहमीच्या जेवणात भात खातात तरी त्यांचे पोट का सुटत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागची मुख्य कारणं समजून घेऊ. (South Indian Secret Why Rice Doesn't Make Them Gain Weight)
दक्षिण भारतीय लोक रोज भात खात असले तरी त्यांचे वजन न वाढण्यामागे केवळ भात नसून त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीचा आणि आहाराच्या पद्धतीचा महत्वाचा वाटा आहे. वजन वाढणं किंवा कमी होणं हे कोणत्याही एका पदार्थावर अवलंबून नसून आहार, जीवनशैली, खाण्यापिण्याच्या इतर सवयींवर अवलंबून असते. कोणत्याही एका पदार्थांमुळे वजन वाढत नाही (Ref). वजन वाढणं किंवा पोट सुटणं याला बऱ्याच गोष्टी जबाबदार असतात. दक्षिण भारतीय लोक फक्त भात खात नाहीत तर ते त्याला फायबर आणि प्रथिनांनी युक्त असलेला संतुलित आहार घेतात त्यांची जीवनशैलीही पुरक असते. त्यामुळे फक्त भात खाल्ल्यान त्यांचे वजन वाढत नाही.
भात खाण्याची पद्धत
१) अनेक घरांमध्ये भात शिजवताना त्यातील अतिरिक्त स्टार्च काढून टाकलं जातं. यामुळे भातामधील काही कॅलरीज आणि ग्लुकोज कमी होण्यास मदत होते.
२) अनेकजण पॉलिश न केलेला तांदूळ किंवा जाड तांदूळ वापरतात. या प्रकारच्या तांदळात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट जास्तवेळ भरलेले राहते आणि पचन संथ होते.
३) भातासोबत रस्सम आणि विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात. सांबार आणि भाज्यांमध्ये फायबर्स, प्रथिने मुबलक प्रमाणात असतात जे भातामुळे मिळणाऱ्या कार्ब्सशी संतुलन राखतात.
४) अनेक पारंपारीक पदार्थांमध्ये सकाळच्या नाश्त्यात आणि जेवणात तेलाचा आणि तुपाचा वापर कमी केला जातो. तळलेल्या पदार्थांऐवजी वाफवलेले पदार्थ खाण्यावर जास्त भर असतो.
५) आहारात हळद, कढीपत्ता, आलं आणि मोहोरी यांसारख्या मसाल्यांचा वापर अधिक असतो. ज्यामुळे चयापचन क्रिया वाढवण्यास आणि पचनास चांगली मदत होते.
Web Summary : South Indians maintain weight despite daily rice consumption due to their balanced diet rich in fiber and protein, preparation methods like removing starch, and lifestyle with less oil. Spices like turmeric aid digestion.
Web Summary : दक्षिण भारतीय लोग रोजाना चावल खाने के बावजूद फाइबर और प्रोटीन से भरपूर संतुलित आहार, स्टार्च हटाने जैसी तैयारी विधियों और कम तेल वाली जीवनशैली के कारण वजन बनाए रखते हैं। हल्दी जैसे मसाले पाचन में मदद करते हैं।