Belly Fat : चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा एखादा आजार यामुळे आजकाल भरपूर महिला शरीरात वाढलेल्या चरबीमुळे वैतागलेल्या असतात. जास्तीत जास्त महिला पोटावर आणि कंबरेवर वाढलेल्या चरबीनं चिंतेत असतात. वाढलेल्या चरबीमुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका असतोच, सोबतच लुकही खराब दिसतो. वाढलेली चरबी अनेक प्रयत्न करूनही कमी न झाल्यानं महिलांचा स्ट्रेसही वाढत आहे. अशात एक घरगुती उपाय करून तुम्हाला पोटावरील चरबी कमी करण्यात फायदा मिळू शकतो. रोज जर एक ग्लास कोमट पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर टाकून प्याल तर पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळू शकते. अशात जाणून घेऊ की, अॅपल सायडर व्हिनेगर चरबी कमी करण्यास कसं मदत करतं आणि यानं शरीराला इतर कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
बेली फॅट कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर
एक ग्लास गरम पाण्यात २ चमचे अॅपल सायडर व्हिनेगर टाकून पिऊ शकता. अॅपल सायडर व्हिनेगर पिताना याची काळजी घ्या की, कधीही ते थेट पिऊ नये. ते नेहमी पाण्यात डायल्यूट करूनच प्यावं. अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात टाकून प्याल तरच बेली फॅट कमी होण्यास मदत मिळेल. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये एसेटिक अॅसिड असतं, जे शरीरातील चरबीचं बिल्ड-अप रोखतं आणि चरबी वितळवण्याचं काम करतं. त्यामुळेच याला वजन कमी करण्यासाठी वंडर ड्रिंक म्हटलं जातं.
लो कॅलरी ड्रिंक
१०० ग्रॅम अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये २२ कॅलरी असतात, त्यामुळे हे एक चांगलं लो कॅलरी फॅट लॉस ड्रिंक ठरतं. सकाळी उपाशीपोटी हे पाण्यात टाकून प्यावं. याचा आणखी एक फायदा म्हणजे हे ड्रिंक प्यायल्यानं पोट जास्तवेळ भरलेलं राहतं. त्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.
ब्लड शुगर लेव्हल कमी होते
ब्लड शुगर लेव्हल मॅनेज करण्यासाठीही अॅपल सायडर व्हिनेगर पिऊ शकता. हे पाण्यात टाकून प्यायल्यानं डायबिटीसच्या रूग्णांना फायदा मिळतो.
बॅक्टेरिया मरतात
शरीरात जमा झालेले नुकसानकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरतं. यानं शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत मिळते.
डिटॉक्स होतं शरीर
अॅपल सायडर व्हिनेगर टाकलेलं पाणी चांगल्या डिटॉक्स वॉटरसारखं काम करतं. हे प्यायल्यानं शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतात. त्यामुळे हे ड्रिंक प्यायल्यानं आरोग्य चांगलं राहण्यासोबतच त्वचेचं सौंदर्यही खुलतं.