वाढलेल्या वजनामुळे, लठ्ठपणामुळे आजकाल कितीतरी लोक त्रस्त आहेत. अनेक प्रयत्न करूनही त्यांना वजन कमी करण्यात काही यश मिळत नाहीय. बरं कसंबसं वजन कमी झालं तरी पोटाभोवती साचलेली चरबी कमी करणं खूपच अवघड जातं. आपणही अशाच लोकांपैकी असाल, तर आपण आहारात जिरे पाण्याचा समावेश केलाच पाहिजे. भारतात जिरे पाणी पचन, मेटाबॉलिझम आणि पोटाच्या आरोग्यासाठी पूर्वीपासून प्यायलं जातं. मात्र, जेव्हा त्यात मध घालून प्यायलं जातं, तेव्हा त्याचे फायदे आणखी वाढतात. खासकरून बेली फॅट म्हणजेच पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी हा एक प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. चला पाहुयात जिरे पाण्याचे फायदे आणि ते योग्य पद्धतीने कसे तयार करायचे.
मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतं
जिऱ्याचे पाणी मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतं, मेटाबॉलिझम हे शरीरातील कॅलरी जाळण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जिऱ्यातील काही घटक पचन एन्झाइम्सची क्रिया सुधारतात, ज्यामुळे अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचन होतं. एक चमचा जिऱ्यात फक्त 8 कॅलरीज असतात. म्हणजेच, जिरे पाणी आहारात अतिरिक्त कॅलरीज न वाढवता अनेक आरोग्यदायी फायदे देतं.
जिरे पाण्याचे फायदे
- जिऱ्यात डिटॉक्सिफाइंग गुण असतात. जिरे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि अतिरिक्त पाणी साचणे कमी करण्यास मदत करतं, जे अनेकदा पोटाभोवती सूज म्हणून दिसतं.
- जिऱ्यातील आवश्यक तेल पचन एन्झाइम्सच्या रिलीज होण्यासम मदत करतं आणि गॅस्ट्रिक ज्यूस सक्रिय करून पचन सुधारतात. तसेच पचनसंस्थेतील सूज कमी करतात, ज्यामुळे पोट फुगणे आणि गॅसच्या तक्रारी कमी होतात.
- इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च अँड हेल्थ सायन्सेस मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जिऱ्यात अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत. ते इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारू शकते आणि ग्लुकोजचे शोषण कमी करते, त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
- जिऱ्यात अँटीमायक्रोबियल आणि अँटीऑक्सीडंट गुणधर्म असतात, जे मुरुम कमी करण्यास आणि त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. तसेच त्यात व्हिटॅमिन E सारखे अँटीऑक्सीडंट्स असतात, जे त्वचा निरोगी ठेवतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात.
मधासोबत जिरे पाणी कसे बनवावे?
1–2 चमचे जिरे रात्री एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी 5–10 मिनिटे उकळा आणि नंतर गाळून घ्या. यानंतर त्यात 1 चमचा मध घालून उपाशीपोटी प्या. रोज हा उपाय केला तर काही दिवसांमध्ये आपल्याला फरक दिसू शकेल.
