Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > विकतची-महागडी नाही घरची प्रोटीन पावडर देते बळकट हाडं-मजबूत मसल्स, पाहा घरी प्रोटीन पावडर करण्याची रेसिपी

विकतची-महागडी नाही घरची प्रोटीन पावडर देते बळकट हाडं-मजबूत मसल्स, पाहा घरी प्रोटीन पावडर करण्याची रेसिपी

Homemade Protein Powder Recipe : त्यापेक्षा घरीच काही पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही प्रोटीन पावडर बनवू शकता. घ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:36 IST2026-01-27T13:01:07+5:302026-01-27T14:36:38+5:30

Homemade Protein Powder Recipe : त्यापेक्षा घरीच काही पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही प्रोटीन पावडर बनवू शकता. घ

Homemade Protein Powder Recipe : How To Make Protein Powder At Home | विकतची-महागडी नाही घरची प्रोटीन पावडर देते बळकट हाडं-मजबूत मसल्स, पाहा घरी प्रोटीन पावडर करण्याची रेसिपी

विकतची-महागडी नाही घरची प्रोटीन पावडर देते बळकट हाडं-मजबूत मसल्स, पाहा घरी प्रोटीन पावडर करण्याची रेसिपी

घरीच प्रोटीन पावडर तयार करणं खूपच सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही. बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडरमध्ये  बरेच प्रिजव्हेटिव्हज आणि आर्टिफिशियल शुगर असते. सतत अशा प्रोटीन पावडरचे सेवन केल्यानं तब्येतीचं नुकसान होऊ शकतं. (How To Make Protein Powder at Home)

 त्यापेक्षा घरीच काही पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही प्रोटीन पावडर बनवू शकता. घरगुती प्रोटीन पावडरसाठी लागणारं साहित्य तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होईल. जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा शारीरिक मेहनतीचे काम करत असाल तर तुमच्यासाठी ही पावडर फायदेशीर असेल आणि दिवसभर एनर्जेटीकही वाटेल. (Homemade Protein Powder Recipe)

घरगुती प्रोटीन पावडरसाठी लागणारं साहित्य

 भाजलेले काळे चणे- १०० ग्रॅम, हा प्रोटीनचा मुख्य स्त्रोत आहे.

मखाने - ५० ग्रॅम,  मखाने कॅल्शियम आणि फायबर्सचा उत्तम स्त्रोत आहे.

 बदाम- ५० ग्रॅम, यात गुड फॅट्स आणि ओमेगा-३ असते.

 भोपळ्याच्या बीया- २५ ग्रॅम

 अळशीच्या बीया- २५ ग्रॅम
 
भाजलेले शेंगदाणे- ५० ग्रॅम

अश्वगंधा पावडर- १ मोठा चमचा

प्रोटीन पावडरची सोपी कृती

सगळ्यात आधी कढईत मखाणे, बदाम आणि सर्व साहित्य मंद आचेवर ४ ते ५ मिनिटं भाजून घ्या. जेणेकरून त्यातलं मॉईश्चर निघून जाईल. मखाणे जळणार नाहीत याची काळजी घ्या. भाजल्यानंतर सर्व पदार्थ एका ताटात काढून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या.

हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. हळूहळू वाटून घ्या. जेणेकरून बियांमधून तेल निघेल. तयार पावडर  एका गाळणीनं चाळून घ्या जेणेकरून त्यात कोणतेही मोठे तुकडे राहू नयेत. शेवटी यात अश्वगंधा पावडर मिसळा. हे मिश्रण एका हवाबंद  डब्यात ठेवा. 

या प्रोटीन पावडरचे सेवन कसे करावे?

 व्यायामानंतर २ मोठे चमचे प्रोटीन पावडर  १ ग्लास दुधात किंवा पाण्यात मिसळून प्या. यात नैसर्गिक गोडवा येण्यासाठी तुम्ही गुळाची पावडर किंवा वाटलेले खजूर घालू शकता. जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही सोयाबीन यात मिसळू शकता. ज्यामुळे प्रोटीनचे प्रमाण वाढते.

Web Title : घर पर प्रोटीन पाउडर: शक्ति बढ़ाएं, प्राकृतिक रूप से वजन घटाएं

Web Summary : भुने हुए चने, मखाना, बादाम, बीज, मूंगफली और अश्वगंधा का उपयोग करके आसानी से घर पर प्रोटीन पाउडर बनाएं। यह पौष्टिक मिश्रण ऊर्जा बढ़ाता है, हड्डियों को मजबूत करता है और वजन घटाने में मदद करता है। व्यायाम के बाद दूध या पानी में मिलाकर पिएं। व्यक्तिगत आवश्यकताओं के अनुरूप सामग्री समायोजित करें।

Web Title : Homemade Protein Powder: Boost Strength, Lose Weight Naturally

Web Summary : Easily create protein powder at home using roasted chickpeas, makhana, almonds, seeds, peanuts, and ashwagandha. This nutritious blend boosts energy, strengthens bones, and aids weight loss. Mix with milk or water post-workout. Adjust ingredients to suit individual needs.