आपलं वाढलेलं वजन आणि पोटाची ढेरी पाहायला कुणालाच आवडत नाही. वजन वाढलं की त्यासोबत पोटाची ढेरी देखील वाढतेच. पोटाच्या बाजूला साचलेली (Homemade Desi Tonic To Reduce Belly Fat & Waist Fat) लटकती चरबी (love handles) फक्त दिसायलाच त्रासदायक नसते, तर ती आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. अनेकदा डाएट आणि एक्सरसाइज (Homemade desi tonic for weight loss) करूनही या भागातील चरबी सहज (Natural belly fat burner) कमी होत नाही. पोटाच्या बाजूने लटकणारी चरबी (Ayurvedic drink for flat stomach) दिसू लागली की आपल्याला हवे तसे मनासारखे कपडे घालता येत नाही तसेच काहीवेळा तर चारचौघात लाजिरवाणे देखील वाटते.
पोटावर साचलेली चरबी आणि खास करून बाजूला लटकणारी चरबी काही केल्या कमी होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. पोटाच्या आजूबाजूच्या भागातील साचलेली चरबी फक्त फिटनेस व लूक खराब करत नाही, तर मेटाबॉलिझम आणि एकूण आरोग्यावरही परिणाम करते. यासाठीच, आपण पोटावरील लटकटी चरबी कमी करण्यासाठी एक खास प्रकारचे घरगुती ड्रिंक घरीच तयार करु शकतो. खास करून सकाळी घेतले जाणारे फॅट-कटर ड्रिंक हे पचन सुधारण्यात, शरीर डिटॉक्स करण्यात आणि चरबी कमी करण्यात मदत करतात.
फॅट कटर ड्रिंक कसे तयार करावे ?
घरगुती फॅट कटर ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या डब्यांतील चमचाभर बडीशेप, ओवा आणि ग्लासभर पाणी इतक्या तीनच गोष्टींची गरज लागणार आहे. हे फॅट कटर ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चमचाभर बडीशेप, ओवा घालून ते पाणी चांगले उकळवून घ्यावे. पाणी उकळल्यानंतर ते गाळणीने गाळून घ्यावे. आपले फॅट कटर घरगुती ड्रिंक तयार आहे. रोज सकाळी उपाशीपोटी आपण हे ड्रिंक पिऊ शकता.
मासिक पाळीच्या दिवसात फक्त १ मिनिट करा ‘ही’ गोष्ट, स्तनांमधला जडपणा-दुखणं होईल कमी...
हे घरगुती फॅट कटर ड्रिंक पिण्याचे फायदे...
१. बडीशेपमध्ये असलेले फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स पचनक्रिया सुधारतात.
२. चयापचय क्रिया वेगाने कार्य करु लागते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी सहज बर्न होण्यास मदत मिळते.
गुडघेदुखीचा त्रास-सांध्यांतून कट-कट आवाज येतो? डॉक्टर सांगतात ५ उपाय - दुखणे होईल कमी...
३. बडीशेपमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पोट साफ करण्यात आणि बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करते.
४. ओव्यामध्ये असणारे थायमोल मेटाबॉलिझमचा वेग वाढवते आणि वजन कमी करण्यात मदत करते.
५. ओवा आणि बडीशेप एकत्र घेतल्यास पचनाशी संबंधित अडचणी दूर होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.