Join us

रोज सकाळी उपाशीपोटी पिस्ता खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, दिवसभर राहाल एनर्जेटिक आणि फ्रेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 15:29 IST

Health Benefits of Pistachios : पिस्त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते. यामुळे हाडं निरोगी राहतात.

शरीर निरोगी आणि बळकट  ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी व्यवस्थित असाव्या लागतात. पिस्ता तब्येतीसाठी उत्तम असतो. यातील पोषक तत्व शरीराला पुरेसं पोषण देतात. पिस्ता चवीला उत्तम असतो त्याचबरोबर रोज सकाळी पिस्ता खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. (Pistachio benefits on empty stomach) पिस्त्यामध्ये फायबर्स, कार्ब्स, एमिनो एसिड. मॅग्नेशियम, पोट्रशियम, थियामीन व्हिटॅमीन असतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी पिस्ता खाल्ल्यानं आजारांपासून आराम मिळतो. (Health Benefits of Pistachios) 

पिस्ता खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

डोळ्यांसाठी फायदेशीर

पिस्त्याचे सेवन सकाळी रिकाम्यापोटी केल्यास डोळ्याचं आरोग्य चांगले राहते. यातील पोषक तत्व  डोळ्यांचे आरोग्य सुधारतात. तुम्ही सकाळी उठल्यानंतर रात्री भिजवलेल्या पिस्त्याचे सेवन केले तर पुरेपूर फायदे मिळतील. 

साचलेला कफ बाहेर निघेल; डॉक्टरांनी सांगितलेला १ उपाय करा, खोकला दूर, फुफ्फुसं राहतील फिट

व्हिटामीन ई

यात व्हिटामीन बी-६ असते जे डोपामाईन तयार करण्यासाठी महत्वाचे असते. डोपामाईन एक न्युरोट्रांसमीटर आहे ज्यामुळे एकाग्रता वाढते. मेंदूचे आरोग्य सुधारते. 

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

गर्भवती महिलांसाठी पिस्त्याचे सेवन खूपच फायदेशीर मानले जाते. यातील पोषक तत्व महिलांना गर्भावस्थेत फायदेशीर ठरतात. यातील ओमेगा ३ फॅटी एसिडी गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळासाठी फायदेशीर ठरतात. 

गॅसेसमुळे पोट नीट साफ व्हायला त्रास होतो? रोज 'हे' १ योगासन करा, पोटाचे त्रास राहतील लांब

प्रोटिन्स

प्रोटिन्स शरीरातील हाडांच्या विकासासाठी फायदेशीर ठरते. पिस्त्यात प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे नवीन रक्ताच्या पेशींची वाढ होण्यास आणि मासंपेशींच्या विकासात मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्यच्या प्रयत्नात असाल तर हेल्दी स्नॅक्स म्हणून पिस्त्याचा आहारात समावेश करू शकता. 

हाडांसाठी फायदेशीर 

पिस्त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते. यामुळे हाडं निरोगी राहतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी पिस्ता खाल्ल्यानं हाडं मजबूत राहतात, ऑस्टिओपॅरोसिससारख्या गंभीर आजारांचाही धोका कमी होतो. म्हणूनच रोज सकाळी ३ ते ४  भिजवलेले  पिस्ता खाण्याचा सल्ला दिला जातो.  

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्न