Eating Sweets Habit : जेवण केल्यानंतर अनेकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. मग ते चॉकलेट असो आइस्क्रीम असो वा एखादी मिठाई असो. कधी कधी जेवण झाल्यावर गोड खाणं चुकीचं नाही. पण जर ही तुमची रोजची सवय असेल तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याच्या सवयीने आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, रोज रात्री जेवणानंतर गोड खाल्ल्याने काय होतं.
वजन वाढतं
एक्सपर्टनुसार, जेव्हा तुम्ही गोड खाता तेव्हा ब्लड शुगर लेव्हल वाढते. मग काही वेळाने ती कमी होते. रात्री आपली झोप पूर्ण होत नाही. याचा प्रभाव असा होतो की, सकाळी थकवा जाणवतो. त्याशिवाय रात्री जेवणानंतर शरीर स्वत:ला रिपेअर आणि रिकव्हर करण्याऐवजी ग्लूकोजला एनर्जीमध्ये बदलू लागतं. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, रात्री उशीरा गोड खाल्ल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते, ज्याचा प्रभाव मेटाबॉलिज्मवर पडतो. रात्री जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने वजन अधिक वेगाने वाढतं.
झोप प्रभावित होते
रात्री जेवणानंतर गोड खाल्ल्याने आपल्या झोपेचं खोबरं होतं. साखर झोप कंट्रोल करणाऱ्या मेलाटोनिनला कंट्रोल करते. सोबतच तणाव वाढवणारं हार्मोन कार्टिसोल वाढवते. याचा थेट प्रभाव झोपेवर पडतो. त्याशिवाय गोड पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात.अशात रात्री गोड खाल्ल्याने मेंदू जास्त अॅक्टिव होतो, ज्यामुळे आपल्या स्लीप सायकलवर प्रभाव पडतो.
ब्लड शुगर लेव्हल वाढते
डायबिटीसचे रूग्ण रोज जेवण झाल्यावर गोड खात असतील तर त्यांच्या आरोग्यासंबंधी समस्या वाढू शकतात. एक्सपर्टनुसार, रात्री जास्त गोड खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते. ज्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या जसे की, न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी आणि किडनीसंबंधी समस्या वाढू शकतात. त्याशिवाय रात्री गोड खाल्ल्याने टाइप २ डायबिटीस आणि लठ्ठपणाचा धोकाही राहतो.
गोड खाण्याची सवय कशी कंट्रोल कराल?
एक्सपर्ट सांगतात की, रात्री गोड खाण्याची ईच्छा रोखण्यासाठी तुम्हाला तुमच्या सवयी आणि खाण्यात बदल करावा लागेल. त्यासाठी मॅग्नेशिअम किंवा क्रोमियमसारखे पोषक तत्व मिळवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रूट्स आणि कडधान्याचा आहारात समावेश करा.
रात्रीच्या जेवणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि हेल्दी फॅट भरपूर असलं पाहिजे. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्याशिवाय गोड खाण्याची ईच्छा झाली तर एखादं गोड फळ, डार्क चॉकलेटचा छोटा तुकडा किंवा दही-मध खाऊ शकता. हेही लक्षात ठेवा की, शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. कारण अनेकदा तहान लागल्यावरही गोड खाण्याची ईच्छा होते.